banner ads

संजीवनीचा प्लेसमेंट रेकॉर्ड : एकाचवेळी ८७ विद्यार्थ्यांना नोकरी

kopargaonsamachar
0

 

संजीवनीचा प्लेसमेंट रेकॉर्ड : एकाचवेळी ८७ विद्यार्थ्यांना नोकरी


संजीवनीमुळे ग्रामीण विद्यार्थी होताहेत वयाच्या १९  व्या वर्षीच  कमावते
कोपरगांव समाचार :- संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या एकाचवेळी ८७ विद्यार्थ्यांना बजाज ऑटो लिमिटेड कंपनीने आकर्षक  पगार देऊन नोकरीची संधी दिली. हे विद्यार्थी वयाच्या १९व्या वर्षी कमावते झाले आहेत. ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या नियोजनबध्द पुढाकारामुळे ही किमया घडली.





    बजाज ऑटोने  कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात कंपनीने तृतीय वर्षातील  मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या ३८, मेकॅट्रॉनिक्सच्या १८ व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या ३१ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली.  अंतिम वर्षाच्या परिक्षेच्या निकाला पूर्वी या विद्यार्थ्यांच्या हाती चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑर्डर आली. वयाच्या १९ व्या वर्षी करिअर सुरू झाले. यामुळे हे विद्यार्थी व त्यांचे कुटूंबीय आनंदून गेले आहेत.



         संजीवनीचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांनी ग्रामीण भागातून परिपूर्ण आणि कुशल अभियंते घडावेत असे स्वप्न पाहीले. त्यांची स्वप्नपूर्ती होते आहे.
   संस्थेचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी   अमित कोल्हे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख प्रा. डी. ए. पाटील, प्रा. आय. के. सय्यद, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा.ए. आर. पाबळे, आदी उपस्थित होते.
चौकट:
   संजीवनी पॉलीटेक्निकच्या माध्यमातुन अनेक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन देण्यात यश  येत आहे. मात्र चालु शैक्षणिक वर्षापसून    या पॉलीटेक्निकने ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केल्यामुळे  अधिकाधिक उद्योगाभिमुख शिक्षण  देवुन चांगल्या पॅकेजच्या नोआकार्य  ग्रामीण विद्यार्थ्यांना देणे शक्य होणार आहे. संस्थेचा ट्रेनिंग अँड  प्लेसमेट विभाग विविध नामांकित कंपन्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना तांत्रिक तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व अंगांनी सक्षम बनवतो. त्यामुळे विद्यार्थी केवळ मुलाखतींसाठी तयार होत नाहीत, तर आत्मविश्वासाने  उद्योग विश्वात  पाऊल टाकत आकर्षक  पॅकेजसह नोकरी मिळवितात. यामुळे केवळ व्यक्ती नव्हे तर ग्रामीण अर्थ व्यवस्थेला नवी उभारी मिळत आहे.- 

 अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!