banner ads

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन

kopargaonsamachar
0

 

कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन


कोपरगाव समाचार :- भारतीय समाजव्यवस्थेत समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.





याप्रसंगी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, महात्मा फुले यांनी समाजातील शोषित, वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली तसेच अस्पृश्यता निर्मूलनासाठी धाडसी पावले उचलली. त्यांच्या विचारांमुळेच आधुनिक भारतात सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा मिळाली. महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजात बंधुभाव, समता व प्रगती साधणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता राहिला असून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या


विचारसरणीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची वाटचाल कोपरगाव मतदार संघात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळीअधोरेखित केले.
यावेळी माजी नगरसेवक, गटनेते विरेन बोरावके, डॉ. तुषार गलांडे, राजेंद्र बोरावके, विशाल राऊत, अमोल गिरमे, सतिश भुजबळ, बापूसाहेब इनामके, मयूर बोरावके, नितीन भुजबळ, विजय बागडे, समता उद्योग समुहाचे अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, जनार्दन कदम, संदिप कपिले, सोमनाथ आढाव, शैलेश साबळे, राहुल शिरसाठ, बाळासाहेब रुईकर, विजय त्रिभुवन, माजी नगरसेवक कृष्णा आढाव, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, सचिन गवारे, अर्जुन मरसाळे, चंद्रशेखर म्हस्के, प्रकाश दुशिंग, सचिन परदेशी, जावेद शेख, राजेंद्र खैरनार, डॉ.राजेंद्र रोकडे, भाऊसाहेब भाबड, विकास बेंद्रे, ठकाजी लासुरे, अमजद शेख, विशाल निकम, वैभव कानडे, राजेंद्र उशिरे, जुनेद शेख, प्रदीप कुऱ्हाडे, गणेश गोसावी, राजू पगारे, विजय वढणे, संदिप सावतडकर, शंकर घोडेराव, रमेश गवळी, गायकवाड सर, अनिल बनसोडे आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!