विद्यार्थ्यांना सोशल मिडिया पासुन दूर ठेवण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव द्या --गटशिक्षणाधिकारी शबाना शेख
रवंदे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कलागुणांची रंगतदार मेजवानी
कोपरगांव समाचार :- विद्यार्थ्यांचे मोबाइलचे वाढते व्यसन कमी करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले.
रवंदे येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी त्यांनी विद्यार्थी व पालकांचे प्रबोधन केले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन उपसरपंच ऋषिकेश कदम होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे जेष्ठ सदस्य सुभाष दवंगे होते.गटशिक्षणाधिकारी शबाना शेख पुढे म्हणाल्या की,सोशल मिडियाच्या अती वापरामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष ही भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे,पालकांनी जागरुक राहुन मुलांमध्ये वाचनाची सवय आणी कलागुणांची आवड निर्माण करावी.
कार्यक्रमाच्या प्रास्तविक प्रसंगी मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी शाळेत राबविल्या जाणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली.उपसरपंच ऋषिकेश कदम यांनी मुलांचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे यासाठी मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षण घेण्याचे आवाहन केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत सोनवणे म्हणाले की,ग्रामिण भागातील मुले जिल्हा परिषद शाळांच्या माध्यमातून प्रगती करत आहेत,जिल्हा परिषद शाळा ही केवळ इमारत नसुन ग्रामिण भागातील खर्या अर्थाने ज्ञानमंदिरे आहेत जिथे बालवयातच विध्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्याचे महान कार्य केले जाते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर,धार्मिक,शैक्षणिक आणी सांस्कृतिक विषयांवर आधारीत विविध कलागुण सादर केले.पोवाडे आणी नाटकांनी उपस्थितांची मने जिंकली.स्नेहसंमेलनाच्या माध्यमातुन आपली संस्कृती कशी जोपासावी याचा आदर्शच बालकलाकारांनी आपल्या सादरीकरणातुन घालुन दिला.
याळेळी सरपंच शोभाताई भवर,उपसरपंच ऋषिकेश कदम,मार्केट कमेटी सदस्य साहेबराव लामखडे,सुभाष दवंगे,तान्हाजी लामखडे,ग्रामविकास अधिकारी राजेंद्र बागले,संदिप कदम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत सोनवणे,उपाध्यक्ष ज्योती कदम,विस्तार अधिकारी बाबाजी इरोळे,केंद्रप्रमुख विलास भांड,केंद्रप्रमुख रावसाहेब लांडे आदींसह बाळासाहेब मोरे,बाबासाहेब काळे,कविता झरेकर,सोमनाथ मंडाळकर,नामदेव सोनवणे,लक्ष्मिकांत वाडिले आदी शिक्षक उपस्थित होते.मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले तर शिक्षक अशोक कानडे यांनी सर्वांचे आभार मानले.स्नेहसंमेलनासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.






