शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या कोपरगाव तालुकाप्रमुखपदी वैभव चव्हाण यांची निवड
कोपरगाव समाचार:-- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा डॉ श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने व मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कोपरगाव तालुका प्रमुख पदी वैभव चव्हाण यांची निवड करण्यात आली
वैभव चव्हाण यांनी शिवसेना पक्षाचे काम करत असताना गरजू व सर्वसामान्य रुग्णांना वेळोवेळी मदत केली आहे. याचीच दखल घेत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मदाय रुग्णालयात दहा टक्के राखीव खाटा उपलब्ध करून देणे, निकषात बसत असलेल्या गरीब रुग्णांवर पूर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयामध्ये गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया मोफत करणे या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर राहू असे चव्हाण यांनी सांगितले.
गंभीर महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब गजरू रुग्णांना भरीव प्रमाणात अर्थसाह्य व्हावे याकरीता पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट ,टाटा ट्रस्ट यासारख्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी थेट बाळासाहेब भवन येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा अशा आशयाचे निवडीचे पत्र देताना संस्थापक अध्यक्ष मंगेश चिवटे, कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांनी नमूद केले आहे.




