banner ads

काँग्रेसच्या 'संघटन सृजन' अभियानास कोपरगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

kopargaonsamachar
0

 

काँग्रेसच्या 'संघटन सृजन' अभियानास कोपरगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद


कोपरगाव समाचार
:- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 'संघटन सृजन' अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची महत्त्वपूर्ण आढावा बैठक नुकतीच कोपरगाव येथे संपन्न झाली.






आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठी गर्दी करत शक्तीप्रदर्शन केले. राज्यातील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस हायकमांडने नियुक्त केलेले मुख्य पक्ष निरीक्षक तथा झारखंडचे माजी प्रदेशाध्यकक्ष राजेश ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे . कृष्णा सांगळे आणि जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.राजेश ठाकूर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक ब्लॉक आणि फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांनी पक्ष विस्तारासाठी 'बूथ पातळी'वर काम करण्याचे आवाहन केले."काँग्रेसची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसावी," असे आवाहन कृष्णा सांगळे यांनी यावेळी केले. 

जिल्हा स्तरावरील संघटनात्मक बांधणी आणि आगामी आव्हानांबाबत जिल्हा अध्यक्ष सचिन गुजर यांनी सविस्तर विवेचन केले. या बैठकीत गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत संघटना अधिक मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकी दरम्यान विविध महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले असून, पक्ष संघटन अधिक गतीमान करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. कोपरगाव शहरात झालेल्या या बैठकीमुळे उत्तर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवी उभारी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.या प्रसंगी कोपरगाव काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, कैलास पंडोरे पैलवान,हशमभाई पटेल, सचिन होन,विजय सुधाकर जाधव, विष्णू पाडेकर, ज्ञानेश्वर भगत, राहुल गवळी, सोमनाथ पगारे, सोपान देणक, सुभाष रणधीर, रौनक अजमेरे, पुष्पा भगत, राजुभाई पठाण, महादेव नाना जगताप, बाळासाहेब शिंदे,मयुर आव्हाड ,अमित आढाव यांच्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सेलचे ब्लॉक अध्यक्ष, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. "ज्यांची विचारधारा काँग्रेसशी जुळते, अशा सर्व नागरिकांनी आणि तरुणांनी काँग्रेसमध्ये सामील व्हावे. सक्रिय कार्यकर्ता म्हणून जबाबदारी स्वीकारून लोकशाहीच्या मजबुतीसाठी पुढे यावे," असे आवाहन तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी यावेळी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!