banner ads

कोपरगावच्या पालखी मार्गावर २५ हजारहून अधिक भाविकांना मसाला ताकाचे वाटप;

kopargaonsamachar
0

 

कोपरगावच्या पालखी मार्गावर  २५ हजारहून अधिक भाविकांना मसाला ताकाचे वाटप

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
कोपरगाव समाचार:--श्रीराम नवमीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील पालखी मार्गावरून श्रीक्षेत्र शिर्डीकडे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या श्रद्धाळू भाविकांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार (दि.२६) रोजी तब्बल २५ हजारहून अधिक भाविकांना थंडगार मसाला ताकाचे वाटप करण्यात आले.





युवानेते विवेक कोल्हे व सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते प्रभू श्रीराम तसेच श्री साईबाबांचे पालखी पूजन करून या ताक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे हजारो भाविक भक्त श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव शहरातून श्री क्षेत्र शिर्डी कडे जात असतात.

मागील आठ वर्षांपासून दरवर्षी श्रीराम नवमीच्या पावन दिनी संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे युवासेवक हा स्तुत्य ताक वाटपाचा उपक्रम राबवत आहेत.माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांनी दिलेल्या सेवा हाच धर्म या शिकवणीच्या मार्गावर युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जनहिताचे कार्य मागील आठ वर्षांपासून अविरत सुरू आहे. यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांना कोल्हे परिवाराच्या वतीने श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.दरवर्षी अशा विविध महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमांचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येते.कोपरगाव-कोकमठाण मार्गावरील साई पालखी मार्गावर प्रभू श्रीराम तसेच श्री साईबाबांची ध्यानस्थ स्थितीतील आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली होती, ज्यामुळे उपस्थित भाविकांचे विशेष लक्ष वेधले गेले. यावेळी शेकडो भाविकांना या प्रतिकृतींसोबत सेल्फी व फोटो घेतले.याही वर्षी समस्त साई भक्तांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्यासह मसाला ताकाचे वाटप करण्यात आले असून हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला. 

भर उन्हाच्या तडाख्यात शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी मार्गस्थ झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे समाधानाचे हास्य फुलले.त्यामुळे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षांपूर्वी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांसह लोकसेवेचा वसा घेऊन सुरू केलेला हा उपक्रम आजही सर्वांसाठी तितकाच प्रेरणादायी व दिशादर्शक ठरत आहे.ताक वाटपाचा उपक्रम संपन्न झाल्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवासेवकांनी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!