banner ads

कोपरगावचा उद्योजक दिल्लीत गौरवला

kopargaonsamachar
0

 

कोपरगावचा उद्योजक दिल्लीत गौरवला!


IVM टेक्नॉलॉजीजला राष्ट्रीय पातळीवरील प्लॅटिनम अवॉर्ड”

कोपरगाव समाचार:--कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील भूमिपुत्र मधुसूदन पुंजासाहेब जावळे व ईश्वर रतिलाल चित्रोडा यांचा दिल्लीमध्ये सन्मान करण्यात आला. सोल्युशन प्रोव्हायडर ऑफ द इयर साठीचा एम एस एम ई नॅशनल प्लॅटिनम बिझनेस एक्सलन्स अवार्ड आय व्ही एम टेक्नॉलॉजीज एलएलपी या कंपनीला देण्यात आला. जॉइंट सेक्रेटरी डॉ आलोक कुमार मिश्रा यांच्या हस्ते मधुसूदन जावळे व ईश्वर चित्रोडा यांचा सन्मान करण्यात आला. 


..


मागच्या वर्षी देखील या कंपनीला गोल्डन बिझनेस एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार स्वीकारताना उद्योजक सुखदेव शेंडकर हेदेखील उपस्थित होते. जावळे यांच्या या कंपनीच्या शाखा पुणे मुंबई बेंगलोर चेन्नई कोलकत्ता अदी ठिकाणी विस्तारलेल्या आहेत. या कंपनीची उलाढाल दिल्ली आमदाबाद हैदराबाद अदी ठिकाणी सुरू आहे.सोल्यूशन प्रोव्हायडर ऑफ द इयर” साठीचा MSME नॅशनल प्लॅटिनम बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड हा एक प्रतिष्ठित सन्मान आहे. MSME Chamber of Commerce and Industry of India  संस्थेद्वारे आयोजित केला जाणारा हा पुरस्कार, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) क्षेत्रातील उत्कृष्ट नवकल्पना, उच्च कार्यक्षम तंत्रज्ञान आणि व्यवसाय क्षेत्रावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या संस्थांना गौरवितो.




2025-26 साठी, आय व्ही एम टेक्नॉलॉजीज एल एल पी या कंपनीला "सोल्यूशन प्रोव्हायडर ऑफ द इयर" या श्रेणीत प्लॅटिनम बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे असे मधुसूदन जावळे यांनी सांगितले.हा पुरस्कार भारतीय MSME क्षेत्रातील उत्कृष्टतेचा मापदंड ठरतो आणि नवकल्पना तसेच स्पर्धात्मक वाढीची संस्कृती वाढवण्यास प्रोत्साहन देतो. कंपनीला पुरस्कार मिळाल्याबद्दल मधुसूदन जावळे व ईश्वर चित्रोडा यांचे कोपरगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!