banner ads

सुरेगावात इज्तेमाचा जल्लोष

kopargaonsamachar
0

 

सुरेगावात इज्तेमाचा जल्लोष! मंडप उभारणीला प्रारंभ;


अशोकराव काळे यांच्या हस्ते शुभारंभ”
कोपरगाव समाचार -:-कोपरगाव तालुक्यातीलसुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लिम बांधवांच्या मागणीनुसार कोपरगाव-राहाता तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात येणारा इज्तेमा हा सुरेगाव-शहाजापूर परीसरात होणार आहे. या इज्तेमाच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते गुरुवार (दि.२६) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.





मुस्लिम बांधव एकाच ठिकाणी एकत्र येवून सामुहिक प्रार्थना करण्यासाठी व मुस्लीम बांधवांना धार्मिक प्रबोधनासाठी इज्तेमा आयोजन करण्यात येते. हा इज्तेमा आपल्या गावात व्हावा अशी अनेक गावातील मुस्लीम बांधवांची इच्छा असते. ही सुरेगाव, कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील मुस्लीम बांधवांची इच्छा पूर्ण झाली असून कोपरगाव-राहाता तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात येणारा इज्तेमा हा सुरेगाव-शहाजापूर परीसरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.या इज्तेमाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ प्रसंगी माजी आमदार अशोकराव काळे यांनी सांगितले


की, सुरेगाव,कोळपेवाडी, शहाजापूर, वेळापूर, कोळगाव-थडी आदी गावातील व परिसरातील मुस्लीम बांधवांची इच्छा आणि मागणी होती की, आपल्या भागात इज्तेमा व्हावा हि इच्छा पूर्ण होत असल्याचा अतिशय आनंद आहे. या धार्मिक कार्यासाठी सर्व धर्मियांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
समाजात एकता, शिस्त आणि बंधुभाव यावर मार्गदर्शनासह चांगले आचरण ठेवण्याचे वचन दिले जाते. म्हणूनच मुस्लीम बांधवांसाठी इज्तेमा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा मानला जातो. यावेळी इज्तेमा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मुस्लीम बांधवांनी अल्लाहची दुवा (प्रार्थना) केली. या धार्मिक कार्यक्रमासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत इज्तेमाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुस्लीम बांधवांनी समाधान व्यक्त करून या इज्तेमा कार्यक्रमाला जास्तीत जास्त मुस्लीम बांधवांनी उपस्थित राहावे असे सांगितले.यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपे, गौतम बँकेचे मा.व्हा.चेअरमन राजेंद्र ढोमसे, शहाजापूरचे उपसरपंच शरद वाबळे, कोळपेवाडीचे उपसरपंच सागर कोळपे,सुरेगावचे उपसरपंच दीपक कदम, कचरू कोळपे, सुखदेव कोळपे, भाऊसाहेब कोळपे, पोपटराव जुंधारे, पांडुरंग ढोमसे, पोलीस पाटील इंद्रभान ढोमसे, प्राचार्य नूर शेख, शिवाजी वर्पे, डॉ.इलियास सय्यद, ॲड.शापिक शेख,शकील पटेल, अल्ताफ पटेल, रज्जाक खाटिक, शब्बीर तांबोळी, शफिक शेख, सोयेब पटेल, मोहीज मणियार आदींसह मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!