banner ads

स्पर्धांमधून घडते यशस्वी भविष्य --खासदार भाऊसाहेब वाकचौरे

kopargaonsamachar
0

 

स्पर्धांमधून घडते यशस्वी भविष्य --खासदार भाऊसाहेब वाकचौरे


कोपरगाव समाचार :--वेगवेगळ्या पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करावे लागतात हा छोटासा संदेश प्रत्यक्ष आचरणात आणणारेच आयुष्यात यशस्वी होतात. असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार व माजी सनदी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केले. 






कोपरगाव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे श्री चक्रधर स्वामी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, डीएड, आयटीआय कॉलेज, एनपीपी लॉ कॉलेज आणि केशरबाई महानुभाव नर्सिंग कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार वाकचौरे बोलत होते. 


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री पराग संधान होते. तेलंगणाचे आमदार कोटपल्ली सतीश कुमार, महानंद दूधचे माजी व्हा. चेअरमन राजेंद्र जाधव, बीएसएनएल नवी दिल्लीचे संचालक ॲड. रवींद्र बोरावके, माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या सातभाई, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षा सुधा ठोळे, येवल्याचे सुप्रसिद्ध उद्योजक विक्रम वर्मा, व अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एमपीएससी परीक्षेत यश मिळवून पोलीस खात्यात उच्च पदासाठी निवड झालेली सुभाषनगर कोपरगाव ची सुकन्या कु. उषा गंगाधर पवार हे मान्यवर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
नगराध्यक्ष परागसंधान यांनी कोपरगाव तालुका विद्यार्थी सहायक समितीच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. लॉ, नर्सिंग, डीएड व आयटीआय सारख्या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमामुळे अनेक जण सरकारी नोकरीत आणि मोठ्या संख्येने खाजगी नोकरीत व व्यवसायात लागलेल्या युवकांचे कौतुक केले. स्व. सौ. कमलिनी बाळासाहेब सातभाई शासनमान्य सार्वजनिक वाचनालय-ग्रंथालयाच्या वतीने 15 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेल्या शालेय पातळीवरील सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे पारितोषिक वितरण ही याप्रसंगी सर्व मान्यवरांचे हस्ते संपन्न झाले. चार गटातील 24 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख स्वरूपात बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲड. डॉ. प्रा. हिरालाल महानुभाव यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. सचिव प्रा. राजेंद्र साळुंके, एल एम सी चेअरमन डॉ. निखिल महानुभव, प्राचार्य उबाळे, प्राचार्य वाकचौरे, प्राचार्या विजया थोरे, यांचे सह मुख्याध्यापिका वंदना मराठे, सुवर्णा मठपती यांचेसह परिसरातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. प्रा. करुणा सोनवणे-केदार व श्रीकृष्ण वारुळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रेणुका ढमाले यांचे मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रा. किरण जपे यांनी अहवालवाचन केले. एनपीपी लॉ कॉलेजच्या उपप्राचार्या प्रीती भनसाळी-पारख, ॲड. मंजिरी जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!