भोंदू कॅप्टन खरातच्या विरोधात कृष्णा चांदगुडे यांचा पंचवीस वर्षांपासून लढा
कोपरगाव समाचार -: भोंदू कॅप्टन खरातचे काळे कारनामे दररोज समाजासमोर पुढे येत आहे. त्याला उघडे पाडण्यात अहिल्यानगर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. त्यापैकी एक कृष्णा चांदगुडे हे आहे.कोपरगाव तालुक्यातील चास नळी येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहे.आपण सदर भोंदू बाबाच्या विरोधात त्यांना पंधरा दिवसापासून प्रसार माध्यमातून पाहत आहोत मात्र त्यांचा या भोंदूच्या विरोधातील लढा पंचवीस वर्षापासूनचा आहे.विरोध पत्करून मोठ्या हिमतीने ते लढत आहे.
त्यांनी या भोंदूची पहिली भेट १९९८ ला घेतली.इतर लोक भोंदूच्या पाया पडले पण चांदगुडे पाया पडले नाही म्हणून भोंदूने त्यांना तू विचित्र स्वभावाचा आहे असे सांगून सर्वांसमोर त्यांचा अपमान केला होता.पुढे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या संपर्कात असल्यावर ते अंनिसशी जोडले गेले. त्यांनतर इतर कार्यकर्त्यांसोबत ते भोंदू कॅप्टनच्या विरोधात आजपर्यंत लढत राहिले. अंनिस ला २००७,२०१३,२०२२ अशा तीन वेळा भोंदू कॅप्टन खरात कडून धमक्याही आल्या होत्या
. पण अंनिस त्यांना विरोध करत राहिली.अंनिसने एकदा त्याला दिलेल्या आव्हानानंतर त्याने घाबरून त्तीन महिने आपले दुकान बंद ठेवले होते.पण नंतर दुसऱ्या जागेत पुन्हा चालू केले. २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी दौऱ्यावर आले होते तेंव्हा ते प्रोटोकॉल तोडून सिन्नर तालुक्यातील भोंदू खरात च्या ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहण्यासाठी गेले होते. संविधानिक पदावर बसलेला राज्याचा प्रथम व्यक्ती अंधश्रद्धेला खतपानी घालत असल्याने त्यावेळी चांदगुडे यांनी त्यांस जाहिरपणे विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला गेला होता.पण ते हटले नाही.त्यांच्याकडे या भोंदू विरोधात अनेक तक्रारी येत होत्या पण पुरावे उपलब्ध होत नव्हते कारण पीडितांची पोलिस प्रशासनासमोर येण्याची मानसिकता नव्हती . तरी त्यांनी लढा चालूच ठेवला.या भोंदूवर आत्ता गुन्हा नोंद होऊन अटक झाल्यावर अंनिसने एस.आय. टी.प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेवून काही गोपनीय माहिती दिली. अंधश्रद्धेबाबत आपण पोलिस प्रशासनास मदत करण्यास तयार असल्याचे निवेदन दिले. भोंदू बाबा हा काळी जादू, जादूटोणा जाण्यासाठी वन्यजीवांचा वापर करत असल्याची माहिती प्रथम त्यांनी पोलिस प्रशासनास दिली व वन्य जीव संरक्षण कायद्याचे कलम लावावे , अशी मागणी पहिल्या दिवशीच केली होती. पुढे तपासात ते कलम लागले गेले. सध्या भोंदू खरातचा नरबळी व अंधश्रद्धा याच्या अंगाने तपास चालू आहे.चांदगुडे अंनिस चे राज्य कार्याध्यक्ष असल्याने ते पोलिस प्रशासनास तपासात मदत करत आहे. अनेक गोपनीय माहिती ते त्यांना देत आहे.या भोंदूला अंनिस मुळेच संमत झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्यान्वये अटक झाली हे ही विशेष आहे.अंधश्रद्धेबाबत कुणाला मदत हवी असल्यास त्यांना ९८२२६३०३७८ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.




