banner ads

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच संजीवनीचा ध्यास

kopargaonsamachar
0

 

अनुष्का बनकरची महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघात चमकदार कामगिरी


विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच संजीवनीचा ध्यास
कोपरगाव समाचार :--संजीवनी अकॅडमीची विद्यार्थिनी अनुष्का विजय बनकर हिने राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र सब-ज्युनिअर व्हॉलीबॉल संघात स्थान मिळवले.  चंद्रपूर येथे पार पडलेल्या निवड चाचणीत तिच्या अचूक सर्विस, भक्कम बचाव आणि प्रभावी स्मॅशच्या जोरावर निवड समितीचे लक्ष वेधून घेत तिने महाराष्ट्र  संघात स्थान मिळवुन दि. २४ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान पश्चिम बंगाल येथे आयोजित राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अनुष्काने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. अनुष्काच्या  या यशामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच संजीवनीचा ध्यास ही बाब अधोरेखित झाली आहे,  अशी  माहिती संजीवनी अकॅडमीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.




  अनुष्का सध्या संजीवनी अकॅडमीमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेत असून अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही ती तितक्याच समर्पणाने मेहनत घेत आहे. शालेय स्तरापासून तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत तिने राष्ट्रीय  स्तरापर्यंतचा प्रवास यशस्वी केला आहे. विशेष बाब म्हणजे या संघात अहिल्यानगर जिल्ह्यातून निवड झालेली ती एकमेव खेळाडू ठरली असून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे. देशभरातील नामांकित संघांविरुद्ध खेळताना तिने आत्मविश्वासपूर्ण आणि संघभावनेने परिपूर्ण खेळ सादर केला.

    दररोजच्या कठोर सराव, फिटनेस प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे अनुष्काची  खेळातील गुणवत्ता अधिक विकसित झाली आहे. कुटुंबियांनी दिलेले सातत्यपूर्ण सहकार्य  आणि शाळेतुन मिळालेले प्रोत्साहन यामुळेच हे यश शक्य झाले आहे.  विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती वाढविण्यासाठी संजीवनी अकॅडमीकडून अत्याधुनिक क्रीडा सुविधा, नियमित सराव शिबिरे व स्पर्धांचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे

.-डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स

  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी अनुष्काचे  विशेष अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी अनुष्काचा  सत्कार केला. यावेळी सौ. सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्या अनुश्रीता सिंह, हेड मिस्ट्रेस अपर्णा फडणीस उपस्थित होते. अनुष्काला  प्रशिक्षिका रश्मी  रजपुत यांचे मार्गदर्शन  लाभले.
    अनुष्काच्या या यशामुळे संजीवनी अकॅडमी तसेच संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!