banner ads

पाठपुराव्याला यशाची किनार; कोपरगाव मतदारसंघातील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटी

kopargaonsamachar
0

 

पाठपुराव्याला यशाची किनार; कोपरगाव मतदारसंघातील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटी


आ. आशुतोष काळे यांनी मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
कोपरगाव समाचार:--कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दळणवळणाच्या सोयी-सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे मतदारसंघातील पायाभूत सुविधांबाबत आग्रही मागणी केली होती. या मागणीला यश आले असून सन २०२६-२७ च्या राज्य अर्थसंकल्पामध्ये मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते आणि पुलांच्या कामांचा समावेश करून २५ कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.






यामध्ये कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागांना  रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची व पुलाची अत्यंत दुरवस्था झाली असून राज्य शासनाने राममा २२२ तोलारखिंड कोतुळ सावरचोळ संगमनेर तळेगाव कोपरगाव उक्कडगाव वैजापूर रस्ता (रा.मा.६५) किमी ९०/५०० ते १०१/२५० (झगडे फाटा ते तालुका हद्द खराब रस्त्याची लांबी) मध्ये रस्ता सुधारणा करणे यासाठी १७ कोटी रुपये, भरवस फाटा चास देर्डे चांदवड रस्ता किमी २४२/०५० (रामा-७) (पटेल वस्ती शाजापूर पूल) वर पुलाचे बांधकाम करण्यासाठी ८० लाख रुपये, धारणगांव कुंभारी माहेगांव देशमुख कोळपेवाडी ते रामा-७ (प्रजिमा-८५) किमी ०/००० ते ५/००० (मौजे कुंभारी ते कोळपेवाडी खराब रस्त्याची लांबी) मध्ये रस्ताची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी २० लाख रुपयांचा, जेऊर कुंभारी सडे शिंगवे पुणतांबा रस्ता (रामा ३६) किमी १६/४०० मध्ये जोड रस्त्यासह मोठ्या पुलाचे (कातनाला) बांधकाम करणे यासाठी ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद २०२६-२७ च्या अर्थ संकल्पात करण्यात आली आहे.





आ. आशुतोष काळे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, या निर्णयामुळे मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते आणि पुलांचे प्रश्न आता मार्गी लागणार आहे. कोपरगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे प्रमुख ध्येय आहे. निधीअभावी कोणतीही विकासकामे रखडू नयेत यासाठी मी सदैव प्रयत्नशील असतो. या २५ कोटींच्या निधीमुळे मतदारसंघातील अंतर्गत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत होईल आणि नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!