banner ads

राज्याच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प – स्नेहलता कोल्हे

kopargaonsamachar
0

 

राज्याच्या विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प – स्नेहलता कोल्हे


कोपरगाव समाचार :--30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखपर्यंत कर्जमाफी देणारी ही योजना असणार आहे यासह नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार पर्यंत घोषित करण्यात आले आहे.महाविस्तार AI या प्लॅटफॉर्मवर राज्यातील शेतकऱ्यांना पीकसल्ला आणि बाजारभावाची अचूक माहिती मिळत आहे.परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, निती आयोगाच्या निर्यात सिद्धता निर्देशांक 2024 मध्ये महाराष्ट्राला प्रथम स्थान.राज्यात 2047 पर्यंत प्रवासी आणि मालवाहतुकीकरिता सलग संपर्क जाळे तयार करण्यासाठी हवाई, भुयारी आणि मेट्रोचे जाळे राज्यभर पसरवणार.
ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी पूर्ण यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने जलदगतीने काम करण्याकरिता ही योजना काम करणार.राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा वाटा वाढवण्यासाठी 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना' सुरु करत आहोत.महामानवांच्या कार्याचा गौरव करुन विविध सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार यासह विविध महत्त्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आले आहे.





मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सादर केला असून राज्याला दिशा देणारा दिशादर्शक अर्थसंकल्प म्हणून याकडे पाहावे लागेल असे कोल्हे म्हणाल्या. मत्स्य, बांबू,उद्योग क्षेत्र डिजिटल व्यासपीठ,कृषी व कृषीपूरक,ग्रामीण विकासासाठी घरकुल,सेवा क्षेत्र,प्रगतिशील शाश्वत सर्वमावेशक आणि सुशासन या चतुसूत्रिवर विकसित महाराष्ट्र 2047 चे ध्येय ठेवण्यात आले आहे.पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यास पावले टाकली जातील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे ही अभिमानाची बाब आहे .हा अर्थसंकल्प एक आदर्श अर्थसंकल्प आहे अशी भावना स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.




या अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्व.अजित पवार यांची उणीव निश्चित जाणवली मात्र त्यांच्या विचारांना साजेसा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासमोर ठेवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!