ज्ञानेश्वर माळवे यांची विस्तार अधिकारी पदी निवड
कोपरगाव समाचार :--कोपरगाव येथील शिक्षक नेते ज्ञानेश्वर माळवे यांची पदोन्नतीने नुकतीच अकोले येथे विस्तार अधिकारी (शिक्षण) EXTENSION OFFICER (Education ) या पदावर निवड झाली आहे.त्यांनी टीचर्स इलीजीबीलीटी टेस्ट (TET ) ही पात्रता परीक्षा सप्टेबर 2025 मध्ये दिली होती. पहील्याच प्रयत्नात त्यांनी ती परिक्षा उत्तीर्ण केली.
नुकत्याच जिल्हा परीषद अहील्यानगरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मा.आनंद भंडारी व जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)मा.भास्करराव पाटील यांचेसह शिक्षण विभागाने राबवलेल्या पदोन्नती प्रक्रीयेमध्ये पात्र मुख्याध्यापक,पदवीधर शिक्षक,केंद्रप्रमुख व उपशिक्षकांमधुन पाचजणांना विस्तारअधिकारी पदी पदोन्नती मिळाली.





