banner ads

स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कोपरगावात भक्तीमय कीर्तन सोहळा”

kopargaonsamachar
0

 

स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कोपरगावात भक्तीमय कीर्तन सोहळा”


कोपरगाव समाचार :--सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथे भक्तीमय वातावरणात कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात संपन्न होणार आहे.






या निमित्ताने प्रख्यात धर्माचार्य ह.भ.प. शंकरजी महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या श्रवणीय आणि प्रबोधनात्मक वाणीतून कीर्तन सेवा होणार आहे. स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या कार्याचा व विचारांचा स्मरण करून समाजाला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने या कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकारण, सहकार आणि लोकसेवा या क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे.


 सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट, कोपरगाव यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. स्व.कोल्हे साहेब यांच्या सहवासात काम केलेले समस्त सहकारी, संजीवनी परिवारातील सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, तसेच कोपरगाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी या भक्तीमय कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांनी सहकार चळवळ, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी केलेले योगदान अतुलनीय असून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित हा कीर्तन सोहळा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!