banner ads

पाच रुपयांत महिलांचा सन्मान विकत का?

kopargaonsamachar
0

 पाच रुपयांत महिलांचा सन्मान विकत का? बस स्थानक स्वच्छगृहे मोफत करण्याची मागणी

कृष्णा चांदगुडे यांचे डॉ. नीलम गोऱ्हे  यांना निवेदन 

कोपरगांव समाचार -: राज्यातील बस स्थानकातील स्वच्छतागृहात महिलांची कुचंबणा होते. परिवहन मंत्री अथवा संबधितांशी बोलून महाराष्ट्रातील बस स्थानकातील  सर्व स्वच्छगृहे मोफत उपलब्ध व्हावीत, यासाठी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्न करावा. असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना दिले.





चांदगुडे हे अनेक वर्षांपासून महिलांच्या प्रश्नावर काम करत आहे.अगदी वाडी- वस्त्यांच्या महिलांशी कामनिमित्ताने संपर्क होतो. नुकतेच खेड्यातील काही महिलांनी त्यांच्यासमोर एक समस्या मांडली.तालुक्याच्या किंवा इतर ठिकाणी बस ने प्रवास करताना त्यांची एका बाबतीत कुचंबणा होते. ती म्हणजे स्वच्छता गृहा वर  पाच रुपये आकारले जातात . अनेक वेळा महिलांकडे सुट्टे पैसे नसतात. तिथे स्कॅनर असले तरी खेड्यातील महिलांकडे अँड्रॉइड मोबाईल नसतो. पुरुष कुठेही मोकळ्या जागेवर विधी करतात. पण अशा परिस्थितीत महिलांची कुचंबणा होते. त्यांना मासिक पाळी संदर्भात प्रश्न असतात त्यामुळे त्यांना स्वच्छतागृह आवश्यक असते.तरी , डॉ. नीलम गोऱ्हे  ह्यांनी परिवहन मंत्री अथवा संबधितांशी बोलून महाराष्ट्रातील बस स्थानकातील  सर्व स्वच्छगृहे मोफत उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रयत्न करावा. असे निवेदनात म्हटले आहे. 




निवेदनात पुढे म्हटले आहे की ,बस मध्ये प्रवास करतांना महिलांना प्रवासभाड्यात सवलत दिली जाते मात्र बस स्थानकाच्या  स्वच्छतगृहावर पैसे आकारले जातात.अगदी उपाहारगृहे,मॉल , दवाखाने व इतर ठिकाणी जसे मोफत स्वच्छता गृह असतात तसे शासनाने सर्व बस स्थानकावर कंत्राटी पद्धतीने चालविले जाणाऱ्या स्वच्छता गृह मोफत करावे.ही बाब छोटी वाटत असली तरी महिलांसाठी डोंगराएवढी आहे.डॉ. नीलम गोऱ्हे ह्या महिलांसाठी ठोस काम करतात.म्हणून त्या नेहमीप्रमाणे कार्यवाही करतील अशी अपेक्षा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!