banner ads

संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पातून आत्मनिर्भर भारताची ऊर्जा क्रांती

kopargaonsamachar
0

 अन्नदात्यापासून ऊर्जादात्यापर्यंतचा प्रवास : संजीवनीच्या सीएनजी प्रकल्पातून आत्मनिर्भर भारताची ऊर्जा क्रांती

कोपरगाव -- लक्ष्मण वावरे --:जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असताना भारताने मात्र सक्षम नेतृत्वामुळे स्थैर्य टिकवून ठेवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्ट्रॅटेजिक इंधन साठ्यांमुळे देशात इंधनटंचाई किंवा मोठी दरवाढ होण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही. तरीही भविष्यातील संभाव्य आव्हानांचा विचार करता भारताने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज असल्याचे मत कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.






देशात मोठ्या प्रमाणावर क्रूड ऑइल आणि सीएनजीसारखे इंधन परदेशातून आयात केले जाते. विशेषतः स्ट्रीट ऑफ होर्मुझ या महत्त्वाच्या समुद्री मार्गातून मोठ्या प्रमाणावर इंधन भारतात येते. गेल्या वर्षभरातील आकडेवारीनुसार जवळपास साडेपाच हजार जहाजांमधून इंधन भारतात आयात करण्यात आले असून त्यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.




याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील संजीवनी उद्योग समूह अंतर्गत असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने उभारलेला सीएनजी प्रकल्प हा सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरला आहे. सहकारी तत्वावरील साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचा सीएनजी प्रकल्प सुरू करणारा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन देशाचे सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले होते.


या प्रकल्पामधून दररोज सुमारे १२ टना पर्यंत सीएनजी उत्पादन करण्याची क्षमता उपलब्ध आहे. या इंधनावर जवळपास तीन हजार वाहनं रोज चालू शकतात. अनेक वाहनांमध्ये ड्युअल फ्यूल प्रणाली असल्यामुळे पेट्रोलसह सीएनजीचा वापरही करता येतो. त्यामुळे वाहनचालकांना परवडणारे आणि पर्यावरणपूरक इंधन उपलब्ध होत आहे.शेतकऱ्यांच्या ऊसापासून तयार होणाऱ्या उपउत्पादनांचा वापर करून तयार होणारे हे इंधन ऊर्जा निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता बनत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळत आहे. संजीवनी कारखान्याचा हा प्रकल्प आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे विवेक कोल्हे यांनी सांगितले.उपपदार्थ निर्मितीत संजीवनी उद्योग समूह नेहमीच अव्वल राहिला आहे.माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पश्चात त्यांनी बघितलेले स्वप्न साकार होत आहे अशी भावना कोल्हे यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!