कमी पटसंख्येतूनही बोलकी शाळेची जिल्हास्तरावर यशाची भरारी
जि. प. शाळा बोलकीचा तृतीय क्रमांक
कोपरगाव समाचार :--- संकल्प, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोलकी येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत यशाची भरारी घेतली आहे.
जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागातर्फे आयोजित समूहगीत गायन स्पर्धा (लहान गट) – शालेय पोषण आहार गीत हे समुह गीत शाळेच्या संघाने सादर करून तृतीय क्रमांक पटकावला. कमी पटसंख्या असूनही प्रथमच जिल्हा स्तरावर पोहोचून मिळवलेले हे यश इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गटशिक्षण अधिकारी श्रीमती शबाना शेख, विस्तार अधिकारी श्रीमती अंबिलवादे आणि केंद्रप्रमुख श्री संजय महानुभाव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यशामागे महेंद्र विधाते मुख्याध्यापक, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती लकुडझोडे शिक्षकवृंद व पालकांचा मोलाचा वाटा असून शाळा व्यवस्थापन समिती व सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध विकास सोसायटी चेअरमन व सर्व सदस्य व समस्त बोलकी ग्रामस्थांनीही अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.




