banner ads

मंजूरच्या सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट गो-शाळेस जिल्हास्तरीय पुरस्कार

kopargaonsamachar
0

 

मंजूरच्या सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट गो-शाळेस जिल्हास्तरीय पुरस्कार


कोपरगांव समाचार :-- देशी गोवंशाचे पालन करून संवर्धन करण्यांत तालुक्यातील श्रीक्षेत्र मंजुर येथील सिध्देश्वर देवस्थान ट्रस्टच्या गो-शाळेने श्री श्री श्री १००८ धर्मनिष्ठ, राजगुरू, अनंत विभूषित, महाराष्ट्र पिठाधिश्वर, महामंडलेश्वर, दत्तात्रेयरत्न महान तपस्वी सद्‌गुरू स्वामी शिवानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनांखाली सातत्यांने पुढाकार घेतला असुन या गो शाळेचा जिल्हास्तरावर राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट जिल्हा गो शाळा पुरस्काराने नुकताच गौरव करण्यात आला.




          श्री श्री श्री १००८ धर्मनिष्ठ दत्तात्रेयरत्न स्वामी शिवानंदगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र मंजुर येथे सन २००७ मध्ये थेट राजस्थान येथुन नागोरी जातीच्या पाच गायी त्यानंतर १० ते १२ गीर गायी आणुन त्याचे सर्वोत्कृष्ट संवर्धन केले. गेल्या १९ वर्षात सध्या सिध्देश्वर गो शाळेत १५० पेक्षा अधिक गायींचे संवर्धन होत आहे. या गायींची दैनंदिन सेवा करण्यासाठी पाच ते सहा गोपालक नेमण्यांत आले आहेत. ट्रस्टच्या जमीनीत या गायींसाठी ताजा घास, गिन्नी गवत, मका आदिंची लागवड करून ताजे वैरण या गायींना दिले जाते. गाय संवर्धनाचा प्रति दिवसाचा खर्च सुमारे १० हजार रूपये आहे. याशिवाय त्यांच्या वर्षभराच्या वैरणासाठी गव्हाचे भूस, मका कुटटी, उत्कृष्ट पशुखाद्याचा साठा करून ठेवण्यांत येतो. दररोज पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. दत्तात्रय वाळुंज, डॉ. डी. जे. वायकर हे गायींची विनामुल्य सुश्रृशा करतात. बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत आणि त्यातुन निर्माण होणा-या स्पर्धेतुन सध्या देशी गो-वंश संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे त्यासाठी स्वामी शिवानंदगिरी महाराज यांनी स्वतः पुढाकार घेत हे काम सुरू केले आहे. शासनांच्या महाराष्ट्र गो सेवा आयोग (पुणे) या संस्थेचे अध्यक्ष शेखर मुंदडा व त्यांच्या सहकारी बांधवांनी राज्यभरातील गो-शाळेचे परिक्षण करून कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र मंजुर येथील श्री सिध्देश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित या गो शाळेची जिल्हास्तरावर निवड केली आहे.



 सदरचा पुरस्कार ट्रस्टच्यावतीने सचिव प्रकाश बापुराव लोहकणे, वैभव ढेपले, रोहित भाउसाहेब कणसे, कैलास रक्ताटे, आण्णासाहेब गवळी, डॉ. दत्तात्रय वाळुंज, डॉ. डी.जी. वायकर यांनी अहिल्यानगर येथे स्विकारला. पुरस्काराबददल या गो-शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!