कोपरगाव येथे संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
महिलांचे ढोल पथक व लाठीकाठी ठरले मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण
कोपरगाव समाचार :--राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचालित शहर व तालुका चर्मकार संघ यांचे वतीने कोपरगाव येथे श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यावी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची भव्य प्रतिमा उभारून प्रतिमा पूजन व पालखी पूजन सौ.व श्री.संतोष बनसोडे यांचे हस्ते करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करुन पुष्पहार घालून पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या मिरणुकीत रविदास महिलामंडळ ढोल पथक हे प्रमुख आकर्षण ठरले.
छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बसस्थानक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेपुतळा चौक गोदावरी पेट्रोल पंप, मार्केट यार्ड, जुना टाकळी नाका, समाजमंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक झाली. त्यानंतर समाज मंदिर येथे ह. भ. प. अण्णासाहेब महाराज शिंदे यांनी श्री संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांची महती प्रवचनाद्वारे विषद केले
यावेळी महाप्रसादाचे मानकरी भाऊसाहेब कानडे यांचा व मान्यवरांचा समाज भुषण राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे आणि पदाधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे राहुरी कृषी विद्यापीठ अधिकानरी डॉ बबनराव इल्हे प्रा रमेश इल्हे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर ,प्रसाद आढाव, योवीता आढाव, प्रशांत कडु स्वप्नील कडु, फिरोज पठाण, इम्तियाज अत्तार,वाल्मिक लहिरे, विजय त्रिभुवन, राजेंद्र वाकचौरे, शिवसेना तालुका प्रमुख भरत मोरे, शहर अध्यक्ष गगन हाडा, अक्षय आंग्रे, वर्षाताई शिंगाडे फकीरमामा कुरेशी, योगेश निकम राष्ट्रीय चर्मकार महासंघ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे, वसंतराव थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रीय चर्मकार महासंघ माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे यांनी तर सूत्रसंचालन संजय दुशिंग यांनी केले. तर आभार तालुका अध्यक्ष माधवराव पोटे व शहर अध्यक्ष गणेश कानडे यांनी मानले.
राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. स्नेहा कानडे यांनी समाज मंदिरासाठी भरीव मदत मिळवी याकरिता अशी मागणी नगरपालिका पदाधिकारी यांचे कडे मागणी केली असता त्याबाबत उपनगराध्यक्ष रनशूर यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला व लवकरच कार्यवाही करु अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशींग, संजय पोटे, गणेश कानडे,देविदास कानडे, राकेश धाकतोडे, संतोष कानडे, मयूर कानडे, संदेश कानडे, संतोष दळवी, संतोष बारसे, संदीप बारसे, गणेश शिंदे, गणेश दळवी, सागर पोटे, संतोष शिंदे, अँड. रमेश दुशिंग, जगन कानडे, रमेश मगर सर, संकेत कानडे, बबलू कानडे, अनिल कानडे, दत्तात्रय पठाडे, योगेश मगर, गोरक्षनाथ कानडे, महेश कानडे, संदेश कानडे, भैय्या कानडे, आदींनी परिश्रम घेतले.
ढोल पथकामध्ये सौ. स्नेहा कानडे, सौ. जयश्री कानडे, सौ. मोनिका दुशिंग, सौ. शोभा कानडे, सौ रुपाली बनसोडे, सौ पूजा जाधव, सौ रुपाली राजगुरू,सौ. कोमल कानडे, सो स्वाती सातपुते, कुमारी जानवी पठाडे, कु.निकिता अभंग, कु. सई दुशिंग, सोमनाथ सिलावट, दर्शन जाधव, अभिराज जगताप, तुषार धोंड, तर लाटी गाडीमध्ये कु.श्रद्धा जाधव, कु अक्षरा कानडेआदींनी सहभाग घेतला होता.
याप्रसंगी मारूती सरवार , शिरसाठ, रमेश गायित्रे, डॉ. सातपुते, माधवराव पोटे मेजर, कैलास सातपुते, संजय सरवार, बाळासाहेब सोनटक्के, बबनराव पोटे, अण्णासाहेब बारसे, जगणराव वाकचौरे, दत्तात्रय गायित्रे, मच्छिंद्र आहेर, सोमनाथ कुऱ्हाडे, गुलाब धाकतोडे, दिपक कांबळे, राजेंद्र दळवी, भाऊसाहेब धाकतोडे, राजेंद्र पोटे, पवार सर, भिमा भागवत, पोपटराव शिंदे, संजय कानडे, आदित्य कानडे, नवनाथ कानडे, सोमनाथ लोहकरे,वसंत भागवत मनोज कानडे, चंद्रकांत कानडे, कचरू लोहकरे, स्वप्निल कडू, बाबुराव सातपुते, संजय सातपुते, देविदास कानडे आदींसह समाज बांधव व महीला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते





