banner ads

येसगावातील हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना दिली बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा

kopargaonsamachar
0

 

येसगावातील हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना दिली बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा

कोपरगाव समाचार:--रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव ता. कोपरगाव येथे माता-पालक संघाअंतर्गत सन २०२५-२६ चा हळदी-कुंकू कार्यक्रम आनंदी व उत्साही वातावरणात संपन्न झाला.



कार्यक्रमाची सुरुवात “विसरूनी सारी कडुता,नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा” या संक्रांतीच्या संदेशाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणूका विवेक कोल्हे होत्या . 

त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर, कुटुंबातील सुसंवादावर तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणूनप्रसिद्ध निसर्गोपचार व आहारतज्ञ डॉ. सौ. वर्षा झंवर होत्या उपस्थित मातापालकांना आरोग्य, संतुलित आहार, नैसर्गिक जीवनशैली याविषयी उपयुक्त व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मनोगतातून महिलांना दैनंदिन जीवनात आरोग्य जपण्याबाबत मौलिक सूचना मिळाल्या.


यावेळी अध्यक्ष निवड श्रीमती प्रियंका चाबुकस्वार यांनी मांडली व त्यास अनुमोदन श्रीमती प्रमिला भालेराव यांनी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती स्वप्नाली औताडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती नंदा बढे यांनी केले.


कार्यक्रमात मोठ्या संख्येने मातापालक उपस्थित होत्या. हळदी-कुंकू समारंभ व वाण वाटप पारंपरिक पद्धतीने पार पडले. यावेळी समाजातील गंभीर विषय लक्षात घेऊन बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा उपस्थित सर्व मातापालकांकडून घेण्यात आली. या उपक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकूणच संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून आयोजित केलेला हा हळदी-कुंकू कार्यक्रम सामाजिक जाणीव, सांस्कृतिक परंपरा व महिलांमधील एकोपा यांचा सुंदर संगम ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!