banner ads

वस्तूं ऐवजी विचारांचे वाण वाटणाऱ्या योग साधिका कौतुकास पात्र : मोनीका संधान.

kopargaonsamachar
0

 

वस्तूं ऐवजी विचारांचे वाण वाटणाऱ्या योग साधिका कौतुकास पात्र : मोनीका संधान


कोपरगाव समाचार :--- फक्त वस्तूंची देवाण-घेवाण न करता सर्वांच्या आरोग्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देत विचारांचे वाण देणाऱ्या योग संस्थेच्या योगसाधिका कौतुकास पात्र आहेत. असे मनोगत मोनिका संधान यांनी योग संस्थेच्या हळदीकुंकू कार्यक्रमात व्यक्त केले.




वर्षभरात विविध सण उत्सवाचे निमित्ताने महिलांना एकत्र आणून त्यांच्यात आपुलकीने उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यासाठी योग संस्था नेहमी प्रयत्न करते. त्यातून महिलांच्या कलागुणांना व कल्पकतेला वाव देण्यासाठी प्रयत्न केला जातो. हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने पारंपारिक हळदी कुंकू ला आधुनिक रूप देऊन त्याला एक वेगळा अर्थ देण्यासाठी योग संस्था प्रयत्न करते. सवाष्ण व एकल महिला हा भेदभाव टाळून सर्व महिलांना हळदीकुंकूचा सन्मान दिला जातो.
यावर्षी आपले सर्व सण उत्सव पर्यावरण पूरक करण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळत, ऊर्जेची बचत करत साजरे करावेत. तसेच वैयक्तिक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेत महिलांनी पुढाकार घेण्यासाठी व स्वच्छता अभियानात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी योग शिक्षिका विमल पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला जात आहे.


पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळालेल्या नंदाताई गलांडे, मोनिका संधान, निर्मला कुलकर्णी, अर्चना कडू, योगिता आढाव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विमल पुंडे, सुनिता भुतडा, कविता शहा, रूपाली महाडिक, धनश्री देवरे, स्वाती अमृतकर, वंदना चिकटे , कांचन लाहोटी, वैशाली अमृतकर, कमल नरोडे, कल्पना मोरे , छाया खेमणार, उमा वहाडणे, सारिका भावसार , सुनिता भावसार कविता दर्पेल, उषा राऊत , वर्षा वरखेडे आदी महिलांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!