टाकळी शिवारात बिबट्या पिंजऱ्यात अडकला
कोपरगाव समाचार :-- तालुक्यातील टाकळी, येसगाव शिवारात मंगळवार दि. ६ जानेवारी रोजी पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला.
नोव्हेंबर महिन्यात टाकळी, येसगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक मुलगी व महिला ठार झाली होती. त्यानंतर बिबट्याला ठार करण्यात आले. त्यानंतरही बिबट्यांचा वावर या परिसरात होता. त्यामुळे घबराटीचे वातावरण होते. वनविभागाने पिंजरा लावला होता. मंगळवारी पहाटे माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांच्या गट नंबर १४९ मधील शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दीड वर्षाचा नर जातीचा बिबट जेरबंद झाला. शादीक शेख यांना पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी दिनार कुदळे व सुमित कोल्हे यांना माहिती दिली.
त्यांनी वनविभागाला कळविले. वनाधिकारी एम. वाय. शेख, बी. एच. जाधव वनरक्षक किंकर यांनी त्यास सुरक्षित हलविले. जेरबंद झालेला बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती





