banner ads

जागतिक पातळीवर कॅन्सरचे रुग्ण वाढतायेत ही बाब चिंताजनक! कॅन्सर रोग तज्ञ डॉ मुकुल घरोटे

kopargaonsamachar
0

 

जागतिक पातळीवर कॅन्सरचे रुग्ण वाढतायेत ही बाब चिंताजनक! कॅन्सर रोग तज्ञ डॉ मुकुल घरोटे


कोपरगाव समाचार
. :-
- जगामध्ये कुठल्याही रोगापेक्षा कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतायत ही बाब चिंताजनक आहे. कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे इंडीयन कौन्सिल मेडीकल रिसर्च ( आय सी एम आर) च्या अंदाजानुसार भारतामध्ये सुमारे २०लाख लोक नवीन कॅन्सरचे रुग्ण आहेत, सरासरी १० लाख मृत्यू कॅन्सर मुळे होऊ शकतात जागतिक अर्थकारणाचा अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेतील तीन सर्वात मोठ्या धोक्यापैकी एक आहे तंबाखूजन्य पदार्थ व तंबाखू हि त्या मागची कारणे आहेत . तंबाखू मध्ये एक दोन नव्हे तर तब्बल १०० कॅन्सर करणारे द्रव्य सापडले आहेत. कॅन्सर विरुद्ध लढाईसाठी आता व्यसनापासून दूर राहण्याची गरज असल्याचे मत साईबाबा संस्थानचे कॅन्सर रोग तज्ञ डॉक्टर मुकुंल घरोटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले .




डॉक्टर घरोटे म्हणाले की कॅन्सर संदर्भात आता नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनप्रबोधन होण्याची गरज निर्माण झाली आहे आजाराबाबत जागृती करण्यासाठी सामाजिक सेवाभावी संघटना व कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची मोठी गरज आहे .
भारतात प्रत्येक वर्षी दहा लाख लोक नवीन कॅन्सरग्रस्त लोकांत कॅन्सरचे निदान होत आहे .
त्यात बालकांचा देखील समावेश आहे त्याबरोबर त्यात तरुणांची संख्या देखील मोठी आहे जर या आजारावर मात करायची असेल तर व्यसनापासून दूर राहण्याची काळाची गरज आहे. हा आजार वाढणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाय माहितीचा प्रचार आणि प्रसार होणे महत्त्वाची बाब ठरत आहे .
कॅन्सर ग्रस्त रुग्णांचे मनोबल वाढवणे योग्य उपचार व मार्गदर्शन तसेच कुटुंबातील सदस्यांची सकारात्मक बघण्याचा दृष्टिकोन ही बाब देखील महत्त्वाची आहे वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान यामुळे आजाराला योग्य प्रकारे प्रतिबंध करता येऊ शकतो .कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यू पैकी ७० टक्के मृत्यू विकसनशील भारतासारख्या देशांमध्ये होत आहे .




कॅन्सररोग निदान चाचण्या आवश्यक !
कॅन्सर हा सैतान दबक्या पावलांनी येतो ही शोकांतिका आहे, म्हणून त्रास होण्याची वाट न बघता योग्य वेळी चाचणी केल्यास हा आजार पहिल्या टप्प्यात निदान होऊन पूर्णपणे बरा होऊ शकतो.कॅन्सरग्रस्त रुग्ण सामाजिक परिस्थिती भिती लाजेपोटी आर्थिक परिस्थिती अशा कारणामुळे निदान करत नाही व उपचार घेत नाही ,त्यामुळे देखील काही जण आपला जीव गमावतात.अनेक रुग्ण तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये उपचारासाठी दाखल होतात अशावेळी डॉक्टरांना देखील उपचार करणे अवघड होते.स्त्रीया मध्ये स्तनाचा व गर्भाशयाचा तर पुरुषांमध्ये मुखरोग व फुप्फुसाचा कर्करोग हे कॅन्सर प्रामुख्याने दिसून येतात.हे सर्व आजार लवकर निदान केल्यास पूर्णपणे बरा होतो असे प्रतिपादन डॉ मुकुल घरोटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!