banner ads

रवंदे शाळेच्या शैक्षणिक सहलीतुन ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची पाहणी.

kopargaonsamachar
0

 

रवंदे शाळेच्या शैक्षणिक सहलीतुन ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची पाहणी.


पुरातत्व स्थळ आणी देव देवतांच्या दर्शनाने विद्यार्थ्यांत चैतन्य.
कोपरगाव समाचार :--पी.एम.श्री.जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा रवंदे शाळेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल नाशिक जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी देउन संपन्न झाली.
सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम सिन्नर तालुक्यातील भारतातील पहिले व एकमेव खाजगी रत्न,खनिज व जिवाश्म संग्रहालय म्हणजे गारगोटी संग्रहालयास भेट देउन भूगर्भशास्त्राची माहिती मिळवली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी नाशिक रोड येथील बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती असलेले मुक्तिधाम मंदिरास भेट देउन देवदेवतांचे दर्शन घेतले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतातील प्रमुख लेण्यांपैकी एक असलेल्या व सुमारे अडीच हजार वर्षापुर्वी डोंगरात कोरलेल्या नाशिक येथील पांडव लेण्यांना भेट देउन प्राचीन बौध्द लेण्या व गुंफा पाहुन प्राचिन भारताची ओळख करुन घेतली.




शालेय शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या बौध्द स्तुपाचे दर्शन घेउन भगवान गौतम बुध्द यांच्या कार्याची माहिती घेतली.त्यानंतर दादासाहेब फाळके स्मारकाला भेट देऊन नाशिक येथील पंचवटी मधील रामकुंडांचे मनोभावे दर्शन घेऊन पुढे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन शेवटी आशिया खंडातील पहिले मातीचे धरण असलेले गंगापूर धरणास भेट देऊन जलव्यवस्थापनाचे महत्व समजाऊन घेतले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कदम यांनी सहलीत भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व विद्यार्थ्यांना समजाऊन सांगीतले.




शालेय शैक्षणिक सहलीसाठी रवंदे गावचे सरपंच शोभाताई भवर,उपसरपंच ऋषिकेश कदम ,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत सोनवणे,उपाध्यक्ष ज्योती कदम व सर्व सदस्य यांचे सहकार्य लाभले.
शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक प्रभाकर कदम,सुनिता गायकवाड,अशोक कानडे,चंद्रकला डांगे,दत्तात्रय गरुड,संगिता बोधक,दत्तात्रय राऊत,ऊन्नती मोरे,आशा इल्हे,पल्लवी पवार,शिला काळे,कोमल लामखडे,मंगल तांबे,सिंधुबाई कवाडे ,जयदिप कदम आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!