banner ads

नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा .. नितिनराव औताडे

kopargaonsamachar
0

 

नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा .. नितिनराव औताडे


पोहेगांवात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
कोपरगाव समाचार : -- आपलं आरोग्य व शरीर सुदृढ असेल तर आपण सर्व समस्यांवर मात करू शकतो. शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रा मार्फत लहान मुलापासून महिला व नागरांकांना विविध आजारावर उपचार दिले जातात. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना या योजनेची माहिती मिळत असते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व सुविधांचा लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.



ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पोहेगांव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र पोहेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना बोलत होते.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच अलका जाधव , उपसरपंच अमोल औताडे, कोपरगाव बाजार समितीचे संचालक अशोक नवले , रविंद्र औताडे , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. आकांक्षा वाडेकर, डॉ. गणेश लहारे, डॉ. तोरकर , डॉ. नागरे ,
ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र टिळेकर, पोहेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, सर्व आशा सेविका,अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले.



 या आरोग्य शिबिरास गट विकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबनराव वाघमोडे यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी उपसरपंच अमोल औताडे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!