येसगाव येथे ॲनिमिया मुक्त गाव' अभियान
भव्य सर्व रोग निदान आरोग्य शिबीर
कोपरगाव समाचार : -- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत येसगाव येथे संजीवनी युवा प्रतिष्ठान व ग्रामपंचायत येसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने "ॲनिमिया मुक्त गाव आरोग्य दायी गाव " या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी भव्य सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिरात महिला ,युवती सह ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करून घेतली.या शिबिरात महिलांची हिमोग्लोबिन, ब्लडप्रेशर, शुगर ,तपासणी करण्यात येऊन ॲनिमिया या आजाराविषयी ग्रामस्थांना तज्ञ डॉक्टरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.तर ॲनिमिया मुक्त गाव' अभियानांतर्गत ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी सिध्दार्थ काळे, यांनी सांगितले
यावेळी डॉ.सुजित सोनवणे,उमेश शिरोडे, उपसरपंच संदिप गायकवाड, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह सोसायटीचे चेअरमन तथा ग्रा.पं.सदस्य सचिन कोल्हे, किरण गायकवाड, सुनील पाईक, अतुल सुराळकर, अमोल झावरे, सतिष गोसावी,उमेश कोकाटे, डॉ.नेमाने, माधुरी भारंबे , आरोग्य सेविका,आशा सेविका, ग्रामपंचायत अधिकारी सिध्दार्थ काळे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.







