ब्राम्हणगावच्या ग्रामस्थांना डस्टबिनचे वाटप
कोपरगाव समाचार : - कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने गावठाण हद्दीतील प्रत्येक कुटुंबाला दोन डस्टबिन व वस्ती वरील प्रत्येक कुटुंबाला एक डस्टबिन देण्यात येणार आसून त्याचा शुभारंभ काल सरपंच अनुराग येवले ,उपसरपंच यमुनाबाई आसने ,सर्व ग्राम पंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी विजय पाटील व गावातील जेष्ठ मंडळी युवक कार्यकर्ते व महिला भगिनी यांच्या उपस्थितीत करण्यात आला .
युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनखाली ग्रामपंचयात च्या विविध योजना सुरू असून विकासाला नवी गती मिळाली आहे
मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियान अंतर्गत गटविकास अधिकरी संदीप दळवी व विस्तार अधिकारी प्रशांत तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राह्मणगाव मध्ये हे अभिनव उपक्रम राबविले जात आहे मागील एक वर्षापासून घंटागाडी नियमित ब्राह्मणगाव मध्ये दररोज कचरा संकलन करत असून गाव त्यामुळे गाव स्वच्छ राहण्यात मोठी मदत होत आहे .. डस्टबिन वाटप मुळे आता महिला भगिनींना ओला कचरा व सुका कचरा विलगीकरण करण्यात मदत होणार आहे.
महिला व ग्रामस्थ यांनी ह्या अभिनव उपक्रमाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले आसून ग्रामपंचायत चे सर्वत्र कौतुक केले आहे
सरपंच अनुराग येवले यांनी सांगितले की शहरा प्रमाणे आम्ही ग्रामीण भागात ही घंटागाडी असेल किंवा डस्टबिन असेल ह्या नवीन संकल्पना प्रतक्यक्षात आणल्या असून त्यांची नियमित अमलबजावणी देखील सुरू असून गावच्या विकासाला या मुळे चालना भेटणार आहे ब्राह्मणगाव ला मागील वर्षी स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला असून ह्या वर्षी देखील मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियान मध्ये पुरस्कार मिळवन्यासाठी आम्ही सर्व कष्ट घेत राहू ही ग्वाही दिली .





