banner ads

आम्ही लढलो, भिडलो आणि जिंकलो.” -- विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 

आम्ही लढलो, भिडलो आणि जिंकलो.” -- विवेक कोल्हे


महिलांची मते निर्णायक ठरली --- स्नेहलता कोल्हे 
कोपरगाव समाचार : -- कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर युवानेते विवेक कोल्हे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांचे मार्गदर्शन लाभले, मात्र या विजयाचे खरे श्रेय सर्वसामान्य जनता आणि समाजातील सर्व घटकांना जाते,“अकरा वर्षांपासून आमच्यावर विजयाचा गुलाल पडलेला नव्हता. विरोधकांनी विविध डावपेच आखले, मात्र जनतेच्या पाठबळामुळे आम्ही ते पार करत विजय मिळवला. विश्वासनाम्यात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जातील. बदलाचे वारे सुरू झाले असून त्याचा प्रत्यय येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही नक्कीच येईल. आम्ही लढलो, भिडलो आणि जिंकलो.”असे विवेक कोल्हे म्हणाले .



ते पुढे म्हणाले की विरोधकांना निवडणुकीचा सूर शेवट पर्यंत सापडला नाही. स्व.कोल्हे साहेब हयात नसताना त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली गेली त्यानंतर आमच्याकडून प्रतिउत्तर चौकटीत राहून देण्यात आले जे स्वाभाविक होते.निवडणूक संपली की राजकारण संपले असे समजून आम्ही कामाला सुरुवात केली आहे.निवडणूक काळात आम्हाला रोखता येत नाही म्हणून अनेकांनी एकत्र येऊन प्रयत्न केले.विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन आमच्यावर टीका करण्यात आल्या.विरोधकांना प्रचार कशावर करावा हे समजले नाही कारण यापूर्वी सत्तेत ते होते. त्यांनी केलेल्या गैरप्रकारामुळे जनता आमच्या बाजूने आहे हे स्पष्ट झाल्यानंतर पातळी समोरून सोडली गेली होती हे सर्वश्रुत आहे.जनतेने अशा खालच्या पातळीवरील टीकेला नाकारलं आहे.विरोधकांना सुनावताना "तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे" अशा शब्दात विवेक कोल्हे यांनी उत्तर दिले आहे.



यावेळी माजी आमदार सौ. स्नेहलता  कोल्हे म्हणाल्या की, “या निवडणुकीत महिलांचे मत निर्णायक ठरले. हा विजय टिमवर्कचा असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे.”
लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान यांनीही सर्व मतदारांचे आभार मानत सांगितले की, “आता सर्व प्रकारचे राजकारण संपले आहे. उद्यापासून विरोधकांनाही सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम सुरू करू. पदभार स्वीकारताच नागरिकांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण केले जाईल आणि विश्वासनाम्यात दिलेली कामे तातडीने मार्गी लावली जातील.”
भाजपाने कोपरगाव नगरपालिकेत अति-बहुमत मिळवत नगराध्यक्ष पदासह १९ नगरसेवक निवडून आणले आहेत. नगरपालिकेमार्फत सर्वांगीण विकासकामे राबविण्याची ग्वाही यावेळी उपस्थितांनी दिली.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे, लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, निवडून आलेले नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!