banner ads

नाटेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात

kopargaonsamachar
0

 

नाटेगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात


कोपरगाव समाचार : -- नाटेगाव येथील संत तुकाराम माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सन २००३- ४ मध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले सदर संमेलनासाठी त्या बॅचचे जवळपास सर्वच मुले व मुली मोठ्या संख्येने सहभागी होत कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
संमेलनाची सुरुवात शाळेच्या गेट पासून करण्यात आली त्यानंतर नियमित प्रमाणे बेल देऊन प्रार्थना घेण्यात आली व शिक्षकांच्या सूचनेनुसार सर्वजण वर्गात स्थानापन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .शेळके यांची निवड करण्यात आली प्रमुख मान्यवर म्हणून श्री घोरपडे , श्री चौधरी, श्री गोरे,.श्री वाघ आदी शिक्षक उपस्थित होते.



सदर संमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणी विद्यालयाविषयी व शिक्षकांविषयी आपले ऋण व्यक्त केले सर्वांसाठी हा खूप आनंदाचा क्षण होता सर्व विद्यार्थ्यांना आपण पुन्हा लहान होऊन शाळेत जाण्याचा अनुभव आला सदर संमेलन आयोजन करण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले त्यातच महत्वाचे म्हणजे मेजर वसंत मोरे, संतोष मोरे, केशव मोरे, सोपान मोरे, विकास मोरे, राजेंद्र मोरे, नारायण मोरे ,सतीश मोरे, मंगल, मनीषा शिंदे, सुवर्णा, ताई,कौशल्या करुणा,सारिका, ज्योती , संगीता, वैशाली व इतर या सर्वांनी सहकार्य केले व स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले . माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयाला led टीव्ही भेट स्वरूपात देण्यात आली.



सदर स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन पांडुरंग मोरे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!