banner ads

लंडनमध्ये संजीवनीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

kopargaonsamachar
0

 लंडनमध्ये संजीवनीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

संस्थापक स्व.शंकरराव  कोल्हे यांचे बाबत कृतज्ञता-विद्यार्थ्यांकडून मदतीची ग्वाही
कोपरगांव समाचार/ लक्ष्मण वावरे 
 संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित इंजिनिअरींग कॉलेज, एमबीए, पॉलीटेक्निक, फार्मसी अशा  विविध संस्थांमधुन शिक्षण  घेवुन बाहेर पडलेले व सध्या युनायटेड किंग्डम मध्ये विविध पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच इंडियन जिमखाना क्लब, लंडन  (युके) येथे मोठ्या दिमाखात पार पडला.  या मेळाव्यात संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे व अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी कोपरगांव सारख्या ग्रामीण भागात व्यावसायिक शिक्षण  संस्था सुरू केल्यामुळे आम्हाला आज जागतिक पातळीवर संधी मिळाली, अशा शब्दात कृतज्ञता व्यक्त केली तर युके मध्ये येथुन पुढे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम मदत करण्याची ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली, या मेळाव्यास संजीवनीच्या वतीने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी व संनजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रसिडेंट अमित कोल्हे, इंजिनिअरींग कॉलेजचे अकॅडमिक्स डीन डॉ. ए.बी. पवार, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींगचे विभाग प्रमुख डॉ. आर. ए. कापगते व हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे  यांनी हजेरी लावली,  अशी  माहिती संजीवनीच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
       पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनीचे माजी विद्यार्थी श्रीधर बीरावेल्ली (सिनिअर एंटरप्राईज आर्किटेक्ट, सायटिव्हा), विनित मोरे (मॅनेजर, अर्दाघ गु्रप), प्रकाश  आदमाने (डायरेक्टर, युस्साह लिमिटेड) व अनिल गोल्हार (सोल्युशन्स आर्किटेक्ट) यांनी पुढाकार घेवनु आयोजकाची भुमिका खंबिरपणे पेलली. सध्या युके मध्ये सुमारे ८१ माजी विद्यार्थी कार्यरत आहे. त्यातील ४३ माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित होते. यातील संजीवनीच्या वतीने काही विद्यार्थ्यांना त्यांच्या  योगदानबाध्दल गौरविण्यात आले. यात प्राईड ऑॅफ संजीवनी इन युके या पुरस्कारने मागील ३० वर्षांपासून  युके मध्ये वास्तव्यास असणारे परीतोष  घडीयाली, संजीवनी शक्ती पुरस्काराने प्रीथी अय्यर या  १८ वर्षांपासून  वास्तव्यास असलेल्या व वोहरा मोहम्मेदी हे २२ वर्षांपासून  वास्तव्यास असलेल्या संजीवनी युके स्टार पुरस्कारने गौरविण्यात आले. या मेळाव्या दरम्यान अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून संजीवनी प्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
     आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ज्ञान मिळावे यासाठी संजीवनीने अनेक परदेशी  विद्यापीठांशी  सामंजस्य करार केले आहेत. याचअनुषंगाने  संजीवनीच्या शिष्टमंडळाने युके मधिल ब्रुनेल युनिव्हर्सिटी ,सिटी सेंट जॉर्ज्स युनिव्हर्सिटी ऑफ लंडन, केब्रिज, युनिव्हर्सिटी ऑफ बाथ,युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टोल,युनिव्हर्सिटी ऑफ  अॅन्गीया, इत्यादी ठिकाणी भेटी देवुन तेथिल तज्ञांशी  वैचारीक देवाणघेवाण केली.

संजीवनीचे माजी विद्यार्थी-संस्थेची खरी संपत्ती
   कोणत्याही शिक्षण  संस्थेची खरी संपत्ती ही त्या संस्थेचे माजी विद्यार्थी असतात. आज रोजी संजीवनीतुन १९८३ पासुन सुमारे ३५००० विद्यार्थी बाहेर पडले असुन ते जगाच्या विविध देशात  महत्वाच्या जबाबदाऱ्या  यशस्वीरित्या सांभाळत आहे, ही बाब संजीवनीया दृष्टीने भुषणावह आहे. स्व.शंकरराव  कोल्हे यांनी ज्या हेतुने संजीवनी ज्ञानमंदिराची सुरूवात केली, तो हेतु जगभरातील माजी विद्यार्थ्यांच्या जाळ्याने  सफल झाला आहे. हा हेतु अधिक सफल करण्यासाठी संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे संजीवनी युनिव्हर्सिटीसह प्रत्येक संस्था नवनवीन कीर्तिमान स्थापित करीत आहे. संजीवनीच्या ४० वर्षांच्या  प्रदिर्घ प्रवासामध्ये माजी विद्यार्थ्यांचे योगदान मोठे आहे.
 अमित कोल्हे, प्रेसिडेंट,संजीवनी युनिव्हर्सिटी    
    

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!