banner ads

आता कोपरगावातच होणार कॅन्सरवर मोफत उपचार

kopargaonsamachar
0

 आता कोपरगावातच होणार कॅन्सरवर मोफत उपचार 

 कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका तज्ञ डॉक्टर देतील सेवा

कोपरगाव  ( लक्ष्मण वावरे )
अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका (CCA), नाशिक आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “सहकार्य उद्घाटन व संवाद सोहळा” हा कार्यक्रम शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे उत्साहात आणि आनंदात पार पडला.
या कार्यक्रमास डॉ. राजेश वाळवेकर, वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट – कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका, नाशिक; डॉ. लोविन विल्सन, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट – कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका; तसेच डॉ. संदीप मुरुमकर, व्यवस्थापकीय संचालक – वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, कोपरगाव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सहकार्याचा उद्देश ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या तालुक्यातच सुलभ, सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनांमार्फत मोफत कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या माध्यमातून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी CCA चे तज्ञ डॉक्टर कोपरगावमध्ये उपस्थित राहून कॅन्सर रुग्णांची सल्लामसलत आणि तपासणी करणार आहेत. त्यामुळे रुग्णांना आता प्राथमिक निदान, सल्लामसलत व फॉलोअपसाठी नाशिकला जाण्याची गरज उरणार नाही.

त्यामुळे आता ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना सर्व सोयी-सुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये शासन योजनेत मोफत उपचार मिळणार आहेत. यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला असून, वेळेवर निदान आणि उपचाराची संधी तालुक्याच्या स्तरावरच मिळू शकणार आहे.
डॉ. राजेश वाळवेकर आणि डॉ. लोविन विल्सन यांनी ग्रामीण भागात कॅन्सर उपचार सुलभ करण्याचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवेल, असे सांगितले. तसेच डॉ. संदीप मुरुमकर यांनी वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तपासण्यांची माहिती दिली.
या भागीदारीमुळे कोपरगाव व परिसरातील कॅन्सर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनांद्वारे मोफत, तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह उपचार मिळणार असून, ही ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!