वन्यजीव संरक्षण सप्ताहात आसने यांचा प्रेरणादायी बीजदान उपक्रम
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
वन्यजीव संरक्षण सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची नवी उमेद निर्माण करणारा उपक्रम शेतकरी भागिनाथ आसने यांनी राबवला आहे
टाकळी येथील वैभव संजय देवकर यांनी बीजदानाविषयी माहिती मिळाल्यानंतर“मलाही काही बिया भेटतील का?” अशी विचारणा केली होती.त्यावर आसने यांनी मनःपूर्वक प्रतिसाद देत वैभव देवकर यांचे मित्र आकाश गाडेकर यांना सीताफळाच्या २०० बिया, तसेच स्वतःच्या शेतात तयार केलेली एक सीताफळ आणि एक रामफळाची रोपटी भेट दिली.रोपे देताना आसने म्हणाले, “बिया देणे म्हणजे निसर्गाला नवीन श्वास देणे आहे.या छोट्या कृतीतून निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त होते.”पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी मागील तीन वर्षांत हजारो बियासामाजिक वनीकरण विभाग व आरंभ फाउंडेशनला निशुल्क दिल्या आहेत.
त्यांच्या या सततच्या प्रयत्नांमुळे परिसरातील अनेक युवक पर्यावरणासाठी कार्य करण्यास प्रेरित झाले आहेत.






