banner ads

कोपरगाव नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून

kopargaonsamachar
0

कोपरगाव नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून 


गटांतील अंतर्गत रस्सीखेच तीव्र होण्याची शक्यता , तिसऱ्या आघाडीकडे लक्ष

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
"राज्यातील आगामी मिनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आज नगर परिषद अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करण्यात आली. राज्यातील 67 नगर परिषदांच्या अध्यक्षपद ओबीसींसाठी जाहीर झाले आहे 67 नगरपरिषदपैकी 34 ओबीसी महिलासाठी आरक्षित करण्यात आले आहे त्यात कोपरगाव नगराध्यक्षपदाचे आरक्षण
ओबीसी प्रवर्गातून निघाले असल्याने  गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे.

कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी झाल्याने आता पुरुष आणि स्त्री कोणालाही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करता येईल 
गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांत इच्छुक नगरसेवकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली होती. अनेकांनी आपले राजकीय गणित मांडत आपणच नगराध्यक्ष होणार, या ब्रह्मकल्पनेत स्वतःला रमवले होते. मात्र, आरक्षणाची घोषणा होताच सर्व समीकरणे बदलली असून अनेकांच्या आकांक्षांना तात्पुरता ब्रेक लागला आहे.

आता कोपरगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार असून काळे आणि कोल्हे गटातील अंतर्गत रस्सीखेच आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही गटांतून ओबीसी प्रवर्गातील बलाढ्य चेहऱ्यांना पुढे आणण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, तिसरी आघाडी काय पाऊल उचलते आणि जनता कोणाला आपली पसंती देते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!