आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची द्वारकामाई वृद्धाश्रमला भेट
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावो ह्या पंक्तीला साजेस असं काम आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण च्या डिप्लोमा आणि डिग्रीच्या विद्यार्थ्यांनी करत द्वारकामाई वृद्धाश्रमाला भेट देत आपली सामाजिक बांधिलकी बांधत कनकुरी रोड शिर्डी येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत एक हात मदतीचा म्हणून विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांची भेट घेऊन तेथील वृद्धांशी संवाद साधला.
सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने आयोजित या उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांनी स्वागत केले. विद्यार्थ्यांनी ज्येष्ठांसोबत वेळ घालवत त्यांच्यासोबत गप्पा गप्पागोष्टी केल्या. त्यामुळे तेथील वातावरण आनंदी झाले. विद्यार्थ्यांनी यावेळी वृद्धांसाठी मेडिकल इमेजेस इमर्जन्सी साठी लागणाऱ्या वस्तू जसे ड्रेसिंग ड्रम, इमर्जन्सी साठी लागणारे मेडिकल डिव्हाइसेस , वेदनाशामक तेल विविध आजारावरील नियमित लागणारे औषध दिली. तसेच अल्पउपहाराचे वितरण केले. त्यामध्ये नाश्त्यासाठी 300 बिस्किट पाकीट, 25 डझन केळी, 150 सफरचंद, 150 मोसंबी, 150 भेळ पाकीट देण्यात आले. या भेटीमुळे तरुण पिढीला समाजसेवेची प्रेरणा मिळाली.
या वेळी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनच्या संचालिका सौ. बेबीताई कातकडे व संचालिका सौ.पुजा कातकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, आमचे भाग्य समजायला हवे की आमच्या सर्वांच्या हातून अशा वृद्ध आई-वडिलांची सेवा घडते आणि विद्यार्थी -दशेत अशी चांगली सत्कार्य करत आहे याचा आर.जे.एस. फाउंडेऍशनला त्याचा अभिमान आहे.
फार्मसी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.डॉ.उषा जैन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आज मोठी शोकांकिका आहे? जे आई वडील आपल्या मुलांना तळ हाताच्या फोडासारखं जपतात त्यातलेच काही निर्दयी मुल आपल्या आई वडिलांना असं वृद्धाश्रमात सोडून येतात?. एकच प्रश्न अजुन पण मनात सातवतोय का या वृद्धांना त्यांच्या मुलांनी बेघर केलं. त्यामुळे इथून पुढे एक ही विद्यार्थी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही व कोणाला पाठवू ही देणार नाही ही ग्वाही सर्व विद्यार्थ्यांकडून घेतली.
वृद्धाश्रम भेटीसाठी संचालिका सौ. बेबीताई कातकडे व संचालिका सौ.पुजा कातकडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन, उप प्राचार्य डॉ. उषा जैन,प्रा. वर्षा भाटि, प्रा. स्मिता शेटे, प्रा. अमृता सिंग, प्रा. सोनाली कोते यांच्यासह कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन चे अध्यक्ष . चांगदेव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, प्रसिद्ध उद्योजक विजय कडू, इंजिनिअर दीपक कोटमे, संचालक प्रणित कातकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.







