औषध वितरण करताना नेहमी अंगी प्रामाणिकपणा व लोकहिताचा विचार करावा” –. चेतन कर्डिले
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने फार्मासिस्टांचा सत्कार.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
“रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” मानून प्रत्येक फार्मासिस्टने औषध वितरण करताना प्रामाणिकपणा व जनहिताचा विचार करावा. लोकांचे आरोग्य अधिक चांगले कसे करता येईल, याचा नेहमी विचार व्हावा. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला तर हमखास यश मिळेल, असा सल्ला सोमनाथ मुळे, औषध निरीक्षक अहिल्यानगर यांनी दिला.
महाविद्यालयात जागतिक फार्मासिस्ट दिनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष . चांगदेवराव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, चेतन कर्डिले (जॉईंट सेक्रेटरी, सेंट्रल झोन महाराष्ट्र), कोपरगाव तालुका केमिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी , उद्योजक विजय कडू , इंजिनिअर दीपक कोटमे , संचालक प्रणित कातकडे व प्राचार्य डॉ. नितीन जैन यांच्या हस्ते झाले.
“थिंक हेल्दी, थिंक फार्मासिस्ट” या थीम अंतर्गत जागतिक फार्मासिस्ट दिन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मासिस्ट दिन हा सर्वांना प्रेरणा देणारा व आरोग्य सेवेत फार्मासिस्टच्या मोलाच्या योगदानाची जाणीव करून देणारा दिवस आहे. हा दिवस सर्व लोकांच्या मेहनत, ज्ञान आणि समर्पणामुळे प्रेरणादायी ठरतो व प्रत्येकाला आरोग्य सेवेत योगदान देण्याची प्रेरणा देतो, असे चेतन कर्डिले यांनी आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसी, कोकमठाण येथे झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सांगितले.
"तू केवळ सावित्रीबाई फुलेच नाहीस तर समाज जनजागृती आरोग्य सेवेसाठी दुर्गाही झालीस, जी आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसी यांनी दिली आहे., असे केमिकल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी यांनी सांगितले.
तुमच्या कॉलेजच्या नावातच जनार्दन स्वामींचे नाव आहे व त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आयुष्यामध्ये प्रगती आणि यशस्वी नक्कीच व्हाल असे मा. भरत मोरे म्हणाले
वर्ल्ड फार्मासिस्ट दिनानिमित्त फार्मसी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच आर.जे.एस. फार्मसी तर्फे यंदाचा 2025 “आयुष्य गौरव पुरस्कार” सुरेंद्र ठोळे तसेच फार्मसी पुरस्कार सुमित चांदगुडे यांना विजय कडू यांच्या हस्ते देण्यात आला सौ. भारती कोळपे यांना फार्मसी पुरस्कार कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ. सौ. उषा जैन यांच्या हस्ते देण्यात आला.
आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसीने आठवडाभर घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यामध्ये व्याख्यानमाला, ब्लड डोनेशन कॅम्प, फार्म अवेअरनेस रॅली, ट्री प्लांटेशन, ग्रामीण रुग्णालय भेट, द्वारकामाई वृद्धाश्रम भेट, पोस्टर कॉम्पिटिशन अशा उपक्रमांचा समावेश होता. याबाबतची माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ. लासुरे , प्रा. सौ. चौधरी व प्रा. सौ. लोखंडे यांनी दिली विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडत मनोगत व कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्यांसह प्राचार्य डॉ. नितीन जैन यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.






