banner ads

संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये वार ट्रॉफी टी ५५ चे लोकार्पण

kopargaonsamachar
0

 सैनिकी प्रशिक्षणामुळे जीवनाला शिस्त  लागते  -आमदार सत्यजीत तांबे


संजीवनी सैनिकी स्कूल मध्ये वार ट्रॉफी टी ५५ चे लोकार्पण
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
संजीवनी सैनिकी स्कूलमधील शिस्त,प्रशिक्षण आणि मूल्याधारित संस्कार पाहता सर्व शाळांमध्ये हे प्रशिक्षण गरजेचे आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांचेप्रमाणेच विद्यार्थ्याप्रती असलेली आपुलकी आणि जबाबदारी कोल्हे कुटुंबाने जपली आहे. याच परंपरेतून संजीवनी समूहाच्या सर्व संस्था ‘संजीवनी ब्रन्ड’ म्हणून ओळखल्या जात आहे. सैनिकी प्रशिक्षणामुळे जीवनाला शिस्त  लागते असे प्रतिपादन नाशिक  पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून १९६५ च्या भारत पाकिस्तन युध्दात वापरलेल्या व संजीवनी सैनिकी स्कूल अँड  ज्युनिअर कॉलेजला मिळालेल्या वार ट्रॉफी टी ५५ (रनगाडा) च्या लोकार्पण सोहळ्यात  आमदार तांबे  बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकारमहर्षी शंकरराव  कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे होते. व्यासपीठावर संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त  सुमित कोल्हे, डायरेक्टर-नॉन अकॅडमिक डी. एन. सांगळे व प्राचार्य कैलास दरेकर उपस्थित होते. संजीवनीच्या ब्रासबॅण्ड पथकाने देशभक्तीपर गीत गावुन उत्तम संचलनाचे सादरीकरण केले.

 वार ट्रॉफी टी ५५ मिळविण्यासाठी सन २०१९ पासुन संरक्षण मंत्रालयाकडे प्रयत्न चालु होते. यापुढेहि विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या हेतुने एनसीसी प्रशिक्षण देण्यासाठी अधिकृत परवानगीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे  विश्वस्त सुमित कोल्हे यांनी यावेळी सांगीतले.  प्राचार्य कैलास दरेकर यांनी आभार मानले
संजीवनी सैनिक स्कूल महाराष्ट्रातील ३८ उत्कृष्ट संस्थापैकी एक आहे. आदर्श  नागरीक घडविणे, ही प्रत्येक शिक्षण  संस्थेची जबाबदारी  असते. आज इंटरनेटमुळे युवक भरकटू शकतात म्हणुन सैनिकी शाळेतील शिस्त  महत्वाची आहे. युध्दात वापरलेला रणगाडा विद्यार्थ्यांना नेहमी देशसेवेची प्रेरणा देत राहील--
-विवेक कोल्हे, 
अध्यक्ष, कोल्हे कारखाना


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!