banner ads

कोपरगाव काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार

kopargaonsamachar
0

 कोपरगाव काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री  बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या (नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद) अनुषंगाने महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कोपरगाव काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी निवडणुकीची तयारी आणि रणनीती यावर सविस्तर चर्चा करत कोपरगाव काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले.

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, सर्व ठिकाणी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करणार असल्याचे यावेळी निश्चित करण्यात आले. पक्ष संघटना बळकट करून एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार थोरात यांनी व्यक्त केला.

यावेळी मार्गदर्शन करताना. बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आणि लोकाभिमुख कामे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. लवकरच कोपरगाव येथे मेळावा घेऊन निरीक्षक नेमून उमेदवार मुलाखत व रणनीती राबवणार असल्याचे स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे, माजी नगरसेवक बाबुराव पहिलवान ऊर्फ कैलास पंडोरे,किसान काँग्रेस चे विजय जाधव, रौणक अजमेरे,निलेश चांदगुडे,विष्णू पाडेकर,शब्बीर शेख,सचिन होन,राजू भाई पठाण,ज्ञानेश्वर भगत,बाबूराव पवार,सोपान धेनक, सोमनाथ पगारे , संजय त्रिभुवन यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे इच्छुक उमेदवार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांच्या  मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!