संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने सुरेश जाधव यांचा नागरी सत्कार
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
सहकारातून समृद्धी कडे जातांना जनतेचे हित जोपासण्यात कोपरगाव शहरासह तालुक्यात अग्रगण्य असणाऱ्या सहकारी बॅका पैकी स्वतःची नावलौकीक व प्रतिष्ठा जपलेली,शहराच्या अग्रभागी असलेल्या स्वर्गीय माजी.सहकारमंत्री शंकररावजी कोल्हे यांच्या ठायी असलेल्या दुरदृष्टीतून साकारलेल्या " साई संजीवनी सहकारी बँकेच्या " व्हाईस चेअरमन पदी .सुरेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल संवत्सर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक .ज्ञानेश्वर बापु परजणे,संजीवनी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र परजणे, भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद काळे, व संवत्सर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य .महेश परजणे यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी.दीनेश बोरनारे, राजेंद्र बोरनारे,.मोहन निकम,योगेश परजणे, गणेश साबळे, संदीप मैंद, संचिन शेटे, राजेंद्र सांगळे, प्रभाकर भाकरे, अनिल भाकरे,.चिमाजी दैने,चि.हेमंत मुकुंद काळे व संजीवनी कारखाना पीए विभागातील गणेश कोताडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
सत्कारमुर्ती श्री.जाधव सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष .बिपीनदादा कोल्हे ,माजी.प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते .विवेक कोल्हे या संपूर्ण कोल्हे परिवाराने आमच्यावर नेहमी विश्वासाने अनेक जबाबदाऱ्या सोपवून त्या पूर्णही करून घेतल्या त्याच अनुसंगाने आज आमच्यावर सोपावलेली हि जबाबदारी सुद्धा तितक्याच विश्वासाने पूर्णत्वास नेण्याचा आटोकाट प्रयत्न करु त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकाऱ्याबरोबरच आशिर्वादाची गरज आहे आणि ती मिळेलच अशी अपेक्षा व्यक्त केली शेवटी उपस्थितांचे आभार मुकुंद काळे यांनी मानले.







