सरसकट पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये ,नुकसान भरपाई द्या
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवेदन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा तडाका कोपरगाव तालुक्याला बसला असून अनेक ठिकाणी उभी पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे वतीने प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संदीप वर्पे म्हणाले की अतिवृष्टीमुळे सोंगणीला आलेले सोयाबीन,मका, पाण्यात गेले हातातोंडाशी आलेला घास गेला ऊस भूईसपाट झाला
शेतकऱ्यांच्या पिकांच भरून न येणारे प्रचंड नुकसान झाले कोणतेही निकष न लावता पंचनामे करा.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करु तसे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या या सरकारने एक रुपयात पिक विमा करत होते ते बंद करून पिक विमा पध्दतीत केलेला बदल व पिक पेरा, ऍप वापरून लावणे हे किचकट काम सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मुळावर आले नेटवर्कची अडचणी मुळे पिक विमा बारगळला
पिक विम्याची पध्दत बदलल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेतकरी संकटात सापडलेला आहे कर्ज माफीची हीच वेळ आहे दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी पन्नास हजार रुपये जमा करा अशी मागणी अँड संदिप वर्पे यांनी केली आहे







