पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने कोपरगावकरांना देवेंद्र फडणवीस यांची अनोखी भेट
मा.आ.स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव बस आकारासाठी सातत्याने नवीन बस उपलब्ध व्हाव्या म्हणून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार कोपरगाव पाच बस नव्याने उद्या उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून सर्वत्र साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने उपलब्ध होणाऱ्या या बस नागरिकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या पाठपुराव्याने दिलेली भेट आहे
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि नोकरदार वर्गासाठी या नवीन बस लाभदायक ठरणार आहे. बस संख्या कमी असल्याने कमी बस मध्ये अधिक प्रवासी वाहतूक करण्याची कसरत कोपरगाव आगारास करावी लागत होती मात्र आता नव्याने उपलब्ध झालेल्या बसमुळे बस प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे.
अनेक गावांमध्ये ग्रामीण भागात बस वेळेवर न पोहोचणे, विद्यार्थ्यांना परीक्षा काळात अधिक प्रवाशांमुळे बसणे प्रवास करणे अडचणीचे होत असे. स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी ही बाब परिवहन मंत्री व मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने कार्यवाही होत सदर बस उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी कोल्हे यांना धन्यवाद दिले आहेत.






