पोहेगांव पतसंस्थेने केला २०० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार... औताडे
पुढील तीन वर्षात ५०० कोटींचे उद्दिष्ट ,३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न,
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
३५ वर्षांपूर्वी पोहेगाव नागरी पतसंस्थेची स्थापना केली मात्र संस्था नावारूपाला येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. संस्थेत ठेव म्हणून ठेवलेला पैसा हा ठेवीदारांच्या कष्टाचा श्रमाचा आहे तो प्रामाणिकपणाने जपला . सर्वांच्या सहकार्याने कोपरगाव शहर व शिर्डीत पोहेगाव पतसंस्थेची शाखा निर्माण करून भाजी विक्रेते , छोट्या व्यापारी व व्यवसायिकापर्यंत कर्ज वाटप केले त्यामुळे अनेकांना संस्थेने आधार दिला. संस्थेचा पारदर्शक व्यवहार व ठेवीदारांचा वाढलेला विश्वास हीच जमेची बाजू असून
पोहेगांव पतसंस्थेने २०० कोटींचा टप्पा पार केला ही अभिमानास्पद बाब आहे. लवकरच संस्था येत्या तीन वर्षात ५०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा विश्वास पोहेगांव नागरी पतसंस्थेचे संस्थापक, शिवसेना जिल्हाप्रमुख नितिनराव औताडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे पोहेगांव नगरी पतसंस्थेच्या ३६ व्या वर्षी सर्वसाधारण सभेत सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास रत्ने, कोपरगाव बाजार समितीचे संचालक अशोकराव नवले, स्थैर्य निधीचे संचालक रमेश झांबरे, ॲड शिवाजी खामकर, बाबासाहेब फटांगरे, प्रा. डॉ. शांतीलाल जावळे, रवींद्र औताडे, प्रकाश औताडे, प्रशांत रोहमारे, नवनाथ औताडे, निवृत्ती औताडे, प्रा. भरत सावंत, त्रिलोक मखिजा, भाऊसाहेब वाघ, प्रमोद भालेराव, रामचंद्र ठोंबरे, अर्जुन पवार , व्यवस्थापक सुभाष औताडे, विठ्ठल घारे, आप्पासाहेब कोल्हे, श्री मोजड, सर्व संचालक सभासद, कर्मचारी, व कलेक्शन प्रतिनिधी उपस्थित होते.
पुढे बोलताना नितिनराव औताडे यांनी सांगितले की दोन विभागाचे कार्यक्षेत्र संस्थेला मिळाले आहे. नाशिक व पुणे विभागातील दहा जिल्ह्यांत संस्थेचा कारभार सुरू झाला आहे लवकरच महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र मिळण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात पाच आदर्श पतसंस्थेपैकी पोहेगाव पतसंस्थेचे नाव घेतले जाते असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक संचालक त्रिलोक मखीजा यांनी केले. तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब औताडे यांनी संस्थेला २ कोटी २३ लाख १५ हजार ६२३ रुपये इतका नफा झाला असून सभासदांची दिवाळी गोड करण्यासाठी संस्था ९ टक्के लाभांश वाटप करणार असल्याचे सांगितले. विषय पत्रिकेचे वाचन आप्पासाहेब कोल्हे यांनी केले. सूत्रसंचालन रियाज शेख यांनी केले तर आभार अर्जून पवार यांनी मानले.







