banner ads

संजीवनी आयुर्वेदा अँड रिसर्च सेंटरमध्ये आयुर्वेद दिवस साजरा

kopargaonsamachar
0

 संजीवनी आयुर्वेदा अँड  रिसर्च सेंटरमध्ये आयुर्वेद दिवस साजरा


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 आयुर्वेद ही केवळ उपचार पध्दती नव्हे तर जीवनशैली  आहे. जगभर आयुर्वेदाकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. सर्वश्रेष्ठ उपचार पध्दती असा लौकीक असलेला आयुर्वेद हा भारताचा अभिमान आहे. भविष्यात आरोग्यदायी भारत घडविण्यासाठी संजीवनी  आयुर्वेदा काॅलेजचे विद्यार्थी आणि डाॅक्टर आपले योगदान देतील. अशा विश्वास संजीवनी शैक्षणीक संकुलाचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी व्यक्त केला.

     राष्ट्रीय  आयुर्वेद दिना निमित्त संजीवनी आयुर्वेदा कॉलेज अँड  रिसर्च सेंटरमध्ये विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचा प्रारंभ करताना ते बोलत होते. यावेळी डाॅ.कौस्तुभ भोईर , संचालक डी. एन. सांगळे, प्राचार्य डॉ. राम पवार, महाविद्यालयातील डॉक्टर व  कर्मचारी उपस्थित होते.
   या निमीत्ताने आयोजित व्याख्यानमालेत  आयुर्वेद आणि दैनंदिन जीवनशैली , लठ्ठपणाची लक्षणे तसेच उपचार या विषयांवर  विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यात विशाखा  विलास राखुंडे, कृतिका श्रीकांत गोडसे, संग्राम शिवाजी पाबळे , श्रुती शिवानंद  स्वामी,नागेश  माणिकराव नारंगले , श्रुती जयदत्त थोटे, आसावरी दिपक पवार यांनी सहभाग घेतला.
     डॉ. भोईर म्हणाले,  लठ्ठपणामुळे आजारांना निमंत्रण मिळते. वजन संतुलीत ठेवणे आवश्यक आहे.  लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक आरोग्य याकडे लक्ष देणे गरजेचे असते. आयुर्वेद उपचार पध्दती हि सर्व आजारांवरील एक आदर्श उपचार पध्दती आहे. डाॅ.उमा भोईर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाविद्यालयाची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.  

      संजीवनी आयुर्वेदा महाविद्यालयात आयुर्वेद दिनाच्या निमीत्ताने आयोजित पाककला स्पर्धा विशेष आकर्षण  ठरली.  लठ्ठपणा, डायबिटीज, हायपरटेंशन ग्रस्तांना सेवन करता येतील असे पदार्थ तयार करणे, हा स्पर्धेचा मुख्य निकष  होता. या स्पर्धेत चक्रपाणी जगदीश शेळके व पायल शामराव जगताप यांनी प्रथम क्रमांक मिळविला. प्रतिक्षा भाऊसाहेब धोदाड व पायल जालिंदर घुले यांनी दुसरा क्रमांक मिळविला. मानसी धनंजय खोले, श्रुती नामदेव पगारे, वळवी तृप्ती मांगीलाल, निकिता संदीप गिरमे व श्रृती अशोक  राठोड यांनी संयुक्तिकरित्या तिसरा क्रमांक पटकाविला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!