banner ads

रांजणगाव सोसायटीच्या चेअरमनपदी नवनाथ वर्पे तर व्हा चेअरमन पदी मीना देशमुख

kopargaonsamachar
0

 रांजणगाव सोसायटीच्या चेअरमनपदी नवनाथ वर्पे तर व्हा चेअरमन पदी मीना देशमुख


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड अलीकडेच मोठ्या उत्साहात पार पडली. ही निवड एस.पी. रुद्राक्ष साहेब, दुय्यम सहाय्यक निबंधक, कोपरगाव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या निवडीत कोल्हे गटाचे नवनाथ भास्कर वर्पे यांची चेअरमनपदी तर सौ. मीना विजय देशमुख यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेसाठी सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. तसेच माननीय कैलासराव रहाणे (माजी भाजपा तालुका अध्यक्ष), प्रकाश गोरडे, सरपंच गजानन मते, उपसरपंच त्रिंबक रामभाऊ वर्पे, नानासाहेब वर्पे, सचिन खालकर, अनिल खालकर, संपत लक्ष्मण खालकर, अरुण वर्पे, धनंजय वर्पे, विलास वामन, अशोक विधे, गणेश खालकर, गीताराम वर्पे, दत्तात्रय वर्पे, दत्ता कोठाळे, प्रशांत भुजगे, सुशांत ठोंबरे, भगवान ठोंबरे, राजेंद्र ठोंबरे, बापूसाहेब ठोंबरे, सुनील रणधीर, बाबासाहेब गुडघे, सोमनाथ वर्पे, रामनाथ साने, राजू दिघे, श्रावण खालकर, वीरेंद्र वर्पे, संतोष वर्पे, राहुल वर्पे आदीसह कोल्हे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनिर्वाचित चेअरमन नवनाथ वर्पे आणि व्हाईस चेअरमन सौ. मीना देशमुख यांचे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी नव्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या प्रगतीसाठी कटिबद्ध राहून उत्कृष्ट कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.मावळते चेअरमन सुरेश तुळशीराम चव्हाण व्हा. चेअरमन रामनाथ खंडू सहाने यांनीही चांगले काम केले याबद्दल त्यांनाही शुभेच्छा दिल्या.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!