banner ads

मळेगावथडी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे शांताराम दवंगे यांची निवड

kopargaonsamachar
0

 मळेगावथडी सोसायटीच्या अध्यक्षपदी कोल्हे गटाचे शांताराम दवंगे यांची निवड 

उपाध्यक्षपदी भाउराव कोंडाजी माळी
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

               तालुक्यातील मळेगांवथडी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी  शांताराम बळवंत दवंगे तर उपाध्यक्षपदी भाउराव कोंडाजी माळी यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,  आमदार स्नेहलता कोल्हे व युवानेते विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

            मळेगांवथडी सोसायटीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची बैठक तालुका सह निबंधक एस. पी. रूद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यात ही निवड करण्यांत आली. 
          प्रारंभी सोसायटीचे माजी अध्यक्ष संतोष लक्ष्मण दवंगे प्रास्तविक करतांना म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकाराला पाठबळ देण्यांसाठी गांवपातळीवरील सहकारी सोसायट्यांना सर्वतोपरी मदत केली. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे हे सोसायट्यांचे प्रश्न समजुन घेवुन त्यावर सतत मार्ग काढतात तर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे शासकीय निमशासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सोसायटी सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतात. यावेळी मावळते अध्यक्ष अनंत दवंगे उपाध्यक्ष सुकदेव शिंदे यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचासत्कार करण्यांत आला.
           याप्रसंगी संचालक सर्वश्री. धनंजय बडदे, अशोक गाडे, बाजीराव दवंगे, सुकदेव शिंदे, रमेश उगले, सचिन चंद्रे, गोकुळ मोरे, इंदुबाई खोंड, कमलबाई दवंगे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुधाकर चंद्रे आदि उपस्थित होते. या निवडीकामी तालुका सह निबंधक कार्यालयाचे  आर. एन. राहणे तसेच सोसायटीचे सचिव शिवाजीराव दवंगे यांनी सहकार्य केले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!