banner ads

मनेगाव जिप शाळेत साताचा भार तिघांच्या खांद्यावर

kopargaonsamachar
0

 मनेगाव जिप शाळेत साताचा भार तिघांच्या खांद्यावर 

विद्यार्थ्यांवीनाच भरली शाळा, प्रशासनाची धावपळ     
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 कोपरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मनेगाव जिल्हा परिषद शाळेत सातवी पर्यंतच्या वर्गांना तीनच शिक्षक असल्याने आज पालकांनी आपली मुलं शाळेत पाठवली नाही. मंजूर शिक्षक मिळत नाही, तो पर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतल्यांनी विद्यार्थ्यांविनाच शिक्षकांना शाळा भरवावी लागली. मनेगाव जिल्हा परिषद शाळेत दोन पदवीधर शिक्षक मंजूर असतानाही एकही शिक्षक अद्यापही हजर झालेला नाही त्यामुळेच पालकांनी मुले न पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग कोल्हे यांनी दिली. 

मनेगाव जिल्हा परिषद शाळेत एक ते सातवी पर्यंतचे वर्ग असून यामध्ये एक ते पाचवी पर्यंत ८१ विद्यार्थी आहे, तर सहावी व सातवीच्या वर्गात एकून २५ विद्यार्थी आहे. एक वर्षापूर्वी सहावी व सातवीला दोन शिक्षक मंजूर होते, त्यातील एक शिक्षक पदोन्नती मिळाल्याने बदलून गेले. त्यामुळे वर्गांसाठी एकच शिक्षक शिल्लक राहिले होते. मात्र नवीन बदल्यांमध्ये ते एकही शिक्षक बदलून गेल्याने या वर्गांसाठी पदवीधर शिक्षकच शिल्लक राहिले नाही. प्रशासनाकडून या तीनच शिक्षकांना सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तोंडी दबाव सुरू केल्याने पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला. पालकांनी एकत्र येत आपली मुले शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र तत्पुरवी शाळेत शिक्षक नसल्याबाबतची कल्पना पालकांनी प्रभारी गटशिक्षण अधिकारी शबाना शेख यांना दिली होती. तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोपही पालकांनी यावेळी केला. 
 दुपार नंतरही पालकांनी विद्यार्थी शाळेत  न पाठवल्याने प्रशासनाकडून गट शिक्षण विस्तार अधिकारी वाकचौरे व केंद्र प्रमुख लांडे यांनी शाळेला भेट देत एक पदवीधर शिक्षक देत असल्याचे तोंडी सांगितले. यावर पालकांचे कोणतेही समाधान झाले नाही, हक्काचे दोन शिक्षक मिळालेच पाहिजे या मागणीवर पालक ठाम राहिल्याने याबाबतची कोंडी कायम राहिली आहे. यावेळी सरपंच अण्णासाहेब गांगवे, सुखलाल गांगवे, मच्छिंद्र गोऱ्हे, भगिरथ झिंजुर्डे, जनार्दन गोऱ्हे, अमोल गोऱ्हे, संतोष गांगवे, शहाजी झिंजुर्डे, सोमनाथ झिंजुर्डे, योगेश कालेवार, एकनाथ जाधव, मच्छिंद्र आढाव, दिलीप आढाव, हिरामण आढाव, पोपट आढाव, बाळासाहेब आढाव, प्रकाश कालेवार, संपत मोरे, विशाल माळी, दीपक कोल्हे, सागर गोधडे साईनाथ जाधव, नवनाथ जाधव, मनोज लहामगे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!