banner ads

आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी - कारभारी आगवण

kopargaonsamachar
0

 आ.आशुतोष काळें च्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या पाण्याचा प्रश्न मार्गी - कारभारी आगवण


पालखेड डाव्या कालव्यातून भरलेल्या पाझर तलावाच्या पाण्याचे कार्यकर्त्यांकडून जलपूजन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

-कर्मवीर शंकररावजी काळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतांना कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी अनेक गावात पाझर तलावांची निर्मिती केली.पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनावर अवलंबून असणाऱ्या या पाझर तलावात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या काळात  हे पाझर तलाव नियमित भरले जात होते. व २०१९ पासून आ. आशुतोष काळे देखील हे तलाव भरून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पूर्व भागातील नागरीकांच्या चिंता मिटल्या असून आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून पूर्व भागाच्या नागरिकांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी केले आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांतून पालखेड डाव्या कालव्यातून कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरसगाव-सावळगाव, कासली व उक्कडगाव येथील पाझर तलाव भरून देण्यात आले आहेत. या पाझर तलावांतील पाण्याचे स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्ते ‘जलपूजन’ करण्यात आले याप्रसंगी कारभारी आगवण बोलत होते. ते पुढे म्हणाले की,पावसाळा संपत आला असून पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे मात्र अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव तालुक्यात व विशेषत: पूर्व भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे पूर्ण भरलेली आहेत.त्यामुळे या धरणातून गोदावरी डाव्या-उजव्या कालव्यांना व पालखेड डाव्या कालव्याला तसेच एक्सप्रेस कालव्याला ओव्हर फ्लोचे पाणी सोडण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे सुरु असलेल्या पालखेड कालव्यातून पूर्व भागातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरले जावून भू-गर्भातील पाणी पातळी वाढण्यास निश्चितपणे मदत होईल व पिकांना देखील फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उक्कडगाव येथील आप्पासाहेब निकम यांनी सांगितले की, आमचे गाव हे तालुक्याच्या सीमेवरचे शेवटचे गाव मात्र आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून मागील सहा वर्षापासून आमच्या गावातील पाझर तलाव आवर्जून भरून दिले जात आहे. याहीवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी आम्ही आ.आशुतोष काळे यांच्याकडे मांडल्या असता त्यांनी त्याचवेळी पाटबंधारे विभागाला सूचना करून पाझर तलाव भरून देण्यास सांगितले होते. तसेच श्री रेणुका माता देवस्थान येथे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रस्त्यासाठी चारीवर  सिमेंट पाईप  टाकणे गरजेचे होते. सिमेंट पाईपची अडचण देखील त्यांनी स्व-खर्चातून दूर केली त्यामुळे तो प्रश्न कायमचा मिटला असल्याचे सांगत सर्व गावांतील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून दिल्याबद्दल नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले.
यावेळी सांडूभाई पठाण, राधु उकिर्डे, शिरसगाव-सावळगावचे  सरपंच अशोक उकिर्डे, तिळवणीचे सरपंच गोविंद पगारे, जिनिंग प्रेसिंगचे मा.व्हा.चेअरमन नानासाहेब निकम, संचालक संदीप शिंदे, गोदावरी खोरेचे संचालक आप्पासाहेब निकम, राहुल गायकवाड, ऋषिकेश भवर, अमृत शिंदे, केशव गायकवाड, गोकुळ गायकवाड, लक्ष्मण भागवत, बाळासाहेब भागवत, रवी सुबे, शांताराम भागवत, जलील पटेल, गोविंद गायकवाड, भिकाजी भागवत, संदीप भागवत, सोमनाथ भागवत, बाबासाहेब भागवत, विनोद भागवत, ज्ञानदेव भागवत, विशाल भागवत, चांगदेव भागवत, किशोर गायकवाड, रावसाहेब उकिर्डे, अनिल वायदेस्कर, बिलाल शेख, तौसिब शहा, सुलतान पटेल, शरद गायकवाड, सोमनाथ भागवत, अक्षय भागवत, उक्कडगाव येथे किसन निकम, वाल्मिक निकम, श्रीरंग निकम, नवनाथ निकम, संदीप निकम, जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक रविंद्र निकम, दत्तात्रय निकम, रमेश पोटे, मेहेश निकम, वाल्मिक निकम, हिरामण गुंजाळ, गणेश निकम, भानुदास निकम, संदिप निकम आदी उपस्थित होते.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!