banner ads

ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

kopargaonsamachar
0

 ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठण

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगांव शहरात कापड बाजार परिसरात गणपत चावडी येथील ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश मंदिरात श्री गणेश सार्वजनिक उत्सव निमित्ताने संस्कृत विषयाची अभिवृद्धी अभियान अंतर्गत डॉ. सी. एम. मेहता विद्यालयातील विद्यार्थिनींनी या वर्षीही सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. 
ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश देवस्थान येथे श्री गणेश सार्वजनिक उत्सव निमित्ताने विविध धार्मिक सेवा, साधना सुरु आहे. शारदा संगित विद्यालय वतीने भक्ती गीतांचा कार्यक्रम, श्री गोरक्षण महिला भजनी मंडळ वतीने भजन सत्संग, ब्राम्हण सभा वतीने सामुदायिक अथर्वशीर्ष असे कार्यक्रम संपन्न झाले आहे. या सह दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथील विद्यार्थीनी यांनी याही वर्षी सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले. 

गणपती अथर्वशीर्ष पठण केल्याने बुद्धीला स्थिरता येते, मनाला शांती मिळते, वाईट गोष्टी दूर होतात आणि व्यक्ती निरोगी, श्रीमंत आणि समृद्ध बनते. बोलतांना उच्चार सुधारतात. हे एक अत्यंत प्रभावी उपनिषद मानले जाते, जे गणपतीला बुद्धी आणि विद्यांचे प्रतीक मानून गणेश उपासकांमध्ये विशेष महत्त्वाचे आहे.
अथर्वशीर्ष पठण नंतर श्लोक घेण्यात आले. ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश देवस्थानचे अध्यक्ष सुरेश महाजन, उपाध्यक्ष सुभाष महाजन, सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, पौरोहित्य प्रदिपशास्री पदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाच्या प्राचार्य अनिता धनक, उपप्राचार्य उज्वला म्हस्के, सुपरवायझर सुनिता पवार, प्रभाकर आभाळे, संस्कृतचे दिगंबर काळे, अंजली मुंढे यांचे सहकार्य लाभले. 
एक सुरात शालेय विद्यार्थीनींनी केलेल्या अथर्वशीर्ष पठणाचे भाविकांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!