banner ads

देशाचा नकाशा साकारत विद्यार्थ्यांनी दिला एकात्मतेचा संदेश

kopargaonsamachar
0

 देशाचा नकाशा साकारत विद्यार्थ्यांनी दिला एकात्मतेचा संदेश


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूल मध्ये १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

यावेळी हिंदी दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेची बैठक व्यवस्था शाळेच्या भव्य प्रांगणात आपल्या भारत देशाच्या नकाशाची भव्य  प्रतिकृती व हिंदी नामफलक साकारत करण्यात आली .

संपूर्ण राज्यात गौतम पब्लिक स्कूल हि इंग्रजी माध्यमातील शाळा शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात प्रसिद्ध आहे त्याचबरोबर विविध उपक्रम राबविण्याच्या बाबतीत देखील शाळेचा मोठा नावलौकिक आहे. याच नावलौकिकाला साजेसा उपक्रम नुकताच संस्थेच्या सचिव सौ.चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय हिंदी दिनानिमित्त १४ सप्टेबर रोजी पार पडला. याप्रसंगी विद्यार्थ्यानी बैठक व्यवस्थेतून साकारलेली देशाच्या नकाशाची भव्य प्रतिकृती लक्षवेधी ठरली. गौतम पब्लिक स्कूलने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेप्रती अभिमान निर्माण करण्याचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी साकारलेला मानवी नकाशा केवळ दृश्य नव्हता, तर त्यामागील विचार, भावना आणि देशप्रेम ही या उपक्रमाची खरी उंची ठरली. गौतम पब्लिक स्कूलचा हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, भाषेचा अभिमान आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजवणारा ठरला.

याप्रसंगी प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत त्यांच्या कलागुणांना उचित न्याय देण्यासाठी सौ.चैताली काळे यांच्या प्रेरणेतून गौतम पब्लिक स्कूलमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.त्यांच्याच संकल्पनेतून आगळ्या वेगळ्या पद्धतीने राष्ट्रीय हिंदी दिन साजरा करण्यात आला. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव सौ.चैताली काळे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे. या उपक्रमासाठी पर्यवेक्षिका ज्योती शेलार, कला विभाग प्रमुख गोरक्षनाथ चव्हाण, हिंदी विभाग प्रमुख सौ.कविता चव्हाण, प्रकाश भुजबळ, इसाक सय्यद, राजेंद्र आढाव, सौ.अंजुम शेख आदींनी परिश्रम घेतले.

 
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!