banner ads

अजूनही तुम्ही भ्रमात असाल त्याचे विश्लेषण करण्यास मी तयार आहे -- आ.काळे

kopargaonsamachar
0

 भविष्यात व्यवसाय वाढीच्या दृष्टीने वाटचाल करावी लागणार -आ. आशुतोष काळे


अजूनही तुम्ही भ्रमात असाल त्याचे विश्लेषण करण्यास मी तयार आहे 

जिनिंग प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा 
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

     :-कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटी संस्था जरी छोटी असली तरी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी हि संस्था प्राणपनाणे जपली.कापूस मिळत नसल्यामुळे येणाऱ्या अडचणी दूर करून कोरुगेटेड बॉक्स तयार करण्याचा पर्यायी व्यवसाय सुरु केला तो व्यवसाय जोरात सुरु आहे.हाच आदर्श घेवून भविष्यात व्यवसाय वाढीच्या दृष्टीने वाटचाल करावी लागणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुका सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित सभासद आणि संचालक मंडळाशी संवाद साधतांना सांगितले.

कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अॅण्ड प्रेसिंग सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेच्या सभागृहात संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपस्थित सभासदांशी संवाद साधतांना आ.आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, संस्था मोठी करण्यासाठी एक एक व्यवसाय वाढवून हळू हळू पुढे गेलं पाहिजे त्यासाठी व्यवसाय वाढीच्या दृष्टीने नवीन मशिनरीच्या माध्यमातून प्रयत्न करावा. आपली संस्था जरी छोटी आहे परंतु त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करते व काही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो याचे मोठे समाधान आहे. भविष्यात संस्था छोट्या व्यवसायातून अजून प्रगतीच्या पुढे जाईल असा विश्वास व्यक्त केला. संचालक मंडळ, सभासद, कमर्चारी संस्थेच्या प्रगतीसाठी चांगले काम करीत आहे त्याबद्दल चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाचे आ.आशुतोष काळे यांनी कौतुक केले.
 संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांनी प्रास्ताविक केले. अहवाल वाचन संस्थेचे जनरल मॅनेजर सुरेश काशीद यांनी केले.
श्रद्धांजली ठराव वाचन पाराजी गवळी यांनी केले.  

सभासदांच्या वतीने विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, संचालक दिलीपराव बोरनारे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, शंकरराव चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारूदत्त सिनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे,मा पं.स.मधुकर टेके, विजयराव रक्ताटे,संभाजीराव काळे,  शिवाजीराव ठाकरे, शिवाजीराव वाबळे, सुदाम लोंढे, भाऊसाहेब देवकर, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक नानासाहेब निकम, सुभाष सोनवणे, सचिन आव्हाड, गणेश गायकवाड,महेश लोंढे, नानासाहेब चौधरी, संदीप शिंदे, संजय संवत्सरकर, पाराजी गवळी, सौ. विमलबाई गवारे, सौ. कांताबाई दहे, शिवाजीराव शेळके, संतोष वर्पे तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुलाब शेख यांनी सूत्रसंचालन केले तर व्हा.चेअरमन शंकरराव गुरसळ यांनी आभार मानले.

याबाबत अधिक विश्लेषण पाहिजे असल्यास माझी तयारी ----
२०२४ च्या माझ्या विधानसभा निवडणूकी अगोदर चार-पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुक पार पडली. त्या निवडणुकीत माझ्यासह सर्व महायुतीचे नेते सर्व ताकदनिशी निवडणुकीला सामोरे गेले. परंतु असे असतांनाही लोकसभा निवडणुकीत कोपरगाव तालुक्यातून अवघे सहा हजाराचे लीड महायुतीच्या उमेदवाराला मिळाले. ज्यावेळी मी २०२४ च्या विधानसभा  निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळी प्रचार करणारे महायुतीचे नेते तेच होते व मतदारही तेच होते पण मी सव्वा लाखाच्या लीडणे निवडून आलो. त्याचे श्रेय तुम्ही घेवू नका. ए पब्लिक है, ए सब जाणती है. अजूनही तुम्ही भ्रमात असाल त्याचे विश्लेषण करण्यास मी तयार आहे. तुम्ही जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गावोगावी कार्यकर्त्यांच्या घोंगडी बैठका घेवून खाजगीत माझ्यावर राजकीय उपकाराची भाषा करतात त्यामुळे मला हि विश्लेषण करायची वेळ आली.आगामी काळात याबाबत तुम्हाला अजून विश्लेषण पाहिजे असल्यास त्याबाबत माझी तयारी आहे.
-आ.आशुतोष काळे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!